Nashik Traffic Update : जेव्हा पालकमंत्री खुद्द रस्त्यावर उतरुन करतात वाहतूक सुरळीत; पाहा VIDEO

विनोद बेदरकर
Friday, 25 December 2020

नाताळ आणि त्याला लागून आलेली सलग सुट्ट्यांमुळे घराबाहेर पडणाऱ्यां नागरिकांची संख्या रस्त्यावर जास्त झाली. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीच्या दरम्यान नाशिकच्या पालकमंत्र्यांची संवेदनशीलता पाहायाला मिळाली.​.पाहा नेमके काय घडले..

नाशिक : नाताळ आणि त्याला लागून आलेली सलग सुट्ट्यांमुळे घराबाहेर पडणाऱ्यां नागरिकांची संख्या रस्त्यावर जास्त झाली. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीच्या दरम्यान नाशिकच्या पालकमंत्र्यांची संवेदनशीलता पाहायाला मिळाली..पाहा नेमके काय घडले..

पालकमंत्र्यांची अशीही संवेदनशीलता 

नाताळच्या सुट्ट्या आणि वीक एन्ड असल्याने लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे  घोटी टोल नाक्यावर आज दोन किलोमीटर अंतरापर्यंत ट्राफिक जाम झाले होती. यावेळी मुंबईहुन नाशिकच्या दिशेने येत असतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा बाजूला थांबवून घोटी टोल नाक्यावर स्वतः उभे राहून सर्व वाहने सोडण्याच्या सूचना केल्या. यानंतर येथील वाहतूक सुरळीत होईपर्यंत मंत्री छगन भुजबळ हे घोटी टोल नाका येथे थांबून प्रवाशांना दिलासा दिला. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal smoothened the traffic on the road nashik marathi news