सुखोई विमान अपघातग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 January 2020

दोन वर्षे होऊन देखील कंपनीकडून मदत अद्यापही देण्यात आलेली नाही. कंपनीने शेतकऱ्यांना देऊ केलेली रक्कम केवळ १४ लक्ष रुपये एवढी असून वास्तविक स्वरूपात १४ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम तुटपुंजी असून शेतकरी अडचणीत आल्या असल्याच्या भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे व्यक्त केल्या.

नाशिक : जून २०१८ साली वायुदलाचे सुखोई विमान कोसळून अपघातग्रस्त झाले. यामध्ये पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने डाळिंब आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र दोन वर्षे होऊनही त्यांना कंपनीकडून केवळ चौदा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जात आहे. ही मदत अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाची आहे.त्यामुळे नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असा आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

Image may contain: 6 people, people smiling, people standing, suit and indoor

सुखोई विमान अपघातग्रस्त शेतकऱ्यांनी घेतली भुजबळांची भेट

सुखोई विमान अपघातग्रस्त शेतकऱ्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या दालनात छगन भुजबळ यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यावेळी आ. दिलिप बनकर, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त जिल्हाधिकारी निलेश सागर यांच्यासह एचएएल विभागाचे अधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Image may contain: 3 people, people sitting, table and indoor

दोन वर्षे होऊन देखील कंपनीकडून अद्यापही मदत नाही

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी छगन भुजबळ यांच्यासमोर मांडल्या. दोन वर्षे होऊन देखील कंपनीकडून मदत अद्यापही देण्यात आलेली नाही. कंपनीने शेतकऱ्यांना देऊ केलेली रक्कम केवळ १४ लक्ष रुपये एवढी असून वास्तविक स्वरूपात १४ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम तुटपुंजी असून शेतकरी अडचणीत आल्या असल्याच्या भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

VIDEO "संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर" - शरद पवार

Image may contain: 2 people, people sitting and indoor

..तर ही रक्कम अत्यंत तुटपुंजी

यावेळी छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान १४ कोटीच्या जवळपास आहे आणि या नुकसानीचे जर कंपनीकडून केवळ १४ लाख रुपये नुकसान भरपाई दिली जात असेल तर ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे कंपनीने केवळ इन्शुरन्सच्या बदल्यात मिळणाऱ्या पैशा  व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात मदत द्यावी. यासाठी एचएएलने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून आपल्या वरिष्ठ विभागास पाठवावा व शेतकऱ्यांना तातडीने ही रक्कम द्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या.

क्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhagan bhujbal on Sukhoi Accidental farmers Nashik Marathi News