VIDEO : पुस्तकाचा विषय सोडून द्या..! 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 17 January 2020

दिल्लीत शिवाजी महाराजांचे नाव देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखकाला पंतप्रधान मोदी यांचा पाठिंबा नसेल. यात तीळमात्रही शंका नाही. राजे-महाराजांजवळ काही भाट असतात. त्यांच्यामुळे राजाचे कधी कधी नुकसान होत असल्याचा टोलाही भुजबळांनी मारला.

नाशिक : शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत केली जाऊ शकत नाही. पुस्तकावरून राजकारणात शब्दांची देवाणघेवाण होत आहे, ती मकरसंक्रांतीनिमित्त गोड गोड बोलून थांबली पाहिजे, असे सूचक विधान अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (ता. 16) येथे केले. 

Image may contain: 6 people, people smiling, people standing, crowd and outdoor

पतंगोत्सवात भुजबळ यांची हजेरी

येथील पतंगोत्सवात गुरुवारी भुजबळ यांनी हजेरी लावली. पतंग उडविल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. दिल्लीत शिवाजी महाराजांचे नाव देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखकाला पंतप्रधान मोदी यांचा पाठिंबा नसेल. यात तीळमात्रही शंका नाही. राजे-महाराजांजवळ काही भाट असतात. त्यांच्यामुळे राजाचे कधी कधी नुकसान होत असल्याचा टोलाही भुजबळांनी मारला. या प्रकरणावर सगळीकडे जागृती होत असून, हे प्रकरण थांबले आहे. 

 

नेत्रदीपक दिव्यांसह आतषबाजीचा आनंदही

येथील माजी नगराध्यक्ष तथा गोल्डमन पंकज पारख यांच्या गच्चीवर जाऊन भुजबळांनी तब्बल दोन तासांवर अधिक वेळ पतंग उडविण्याचा आनंद लुटला. पारख यांनी त्यांचे स्वागत केले. समारोपाला आकाशात सोडल्या जाणाऱ्या नेत्रदीपक दिव्यांसह आतषबाजीचा आनंदही त्यांनी लुटला. राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, अरुण थोरात, वसंत पवार, हुसेन शेख, प्रदीप सोनवणे, मकरंद सोनवणे, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड, प्रवीण बनकर, आल्केश कासलीवाल, नेमिचंद जैन, सरोजिनी वखारे, निसार शहा, निसार निंबूवाले, योगेश सोनवणे, सचिन सोनवणे, अमोल ठाकूर, सचिन कळमकर, आबासाहेब शिंदे, डॉ. संजय जाधव, सिद्धार्थ पारख, राहुल पारख, हर्षद पारख, मलिक अन्सारी, दीपक लोणारी, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे, सुनील पैठणकर आदी उपस्थित होते

क्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

Image may contain: 5 people, people smiling, crowd and outdoor

क्लिक करा > "माझ्या सासूशी फोनवर बोला अन् बायकोला नांदायला पाठवा"..तिने नकार देताच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal visit to the kite festival of Yeola Nashik Marathi News