ह्रदयद्रावक! चिमुकला गौरव खेळता खेळता अचानकच झाला शांत...आईने फोडला हंबरडा

gaurav shevale.jpg
gaurav shevale.jpg

नाशिक : दोन वर्षांचा चिमुकला गौरव बॅट बॉल खेळण्यात दंग होता. या चिमुकल्याची सर्वांनाच तशी ओढ..त्याच्या एकूणच गोड हास्याकडे पाहून सारेच आकर्षित होत. पण बुधवारी अशी एक घटना घडली. ज्यामुळे संपूर्ण इमारतच जणू सुन्न झाल्यासारखी वाटत आहे. कारणही तसेच आहे. काय घडले त्या दिवशी?

चिमुकला गौरव खेळता खेळता झाला अचानक शांत

बुधवारी (ता.29) रात्री 7.30 वाजले होते. सातपूरच्या रुद्रा एव्हेन्यु, कोमल स्वीटजवळ, शेवाळे कुटुंबिय राहतात. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा म्हणजेच गौरव शरद शेवाळे असे त्याचे नाव. त्या दिवशी गौरव आईसोबत घरात क्रिकेट खेळत होता. मात्र, त्याचा बॉल अचानक बाल्कनीतून खाली पडला. त्यामुळे बॉल घेण्यासाठी आई खाली आली. दुसऱ्या मजल्यावर राहत असल्यामुळे आईला खाली येण्यासाठी थोडा वेळ लागला. गौरव बाल्कनीतूनच खाली बघत होता. आई खाली बॉल घेत असतानाच गौरवचा अचानक बघता बघता तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला. यामुळे गौरवच्या छातीला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गौरवची बातमी कळताच आईने एकच हंबरडा फोडला. तसेच नातेवाईकांमध्येही शोकाकुल वातावरण आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले मृत घोषित

त्या घरातील कोणाचे लक्ष नसताना तो दुसऱ्या मजल्यावरून तोल जावून खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही बाब कुटूंबियांना समजताच त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार भूमकर करत आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

 ...तर ही दुर्दैवी घटना घडली नसती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व शाळा-अंगणवाडी-कॉलेज बंद आहेत. त्यामुळे मुलं सध्या घरी आहेत. त्यामुळे मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.गौरवच्या आईने जर विचार केला असता की आपलं बाळ लहान आहे. त्याला बाल्कनीत सोडून आपण खाली कस जावं. जर आई त्यालाही खाली घेऊन आली असती, तर कदाचित बाळाचा तोल गेला नसता आणि ही दुर्दैवी घटना घडली नसती

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com