अल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड

child marriage.jpg
child marriage.jpg

वणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी गरम पाण्याने जळून जखमी झाल्याने तपासाअंती हा प्रकार उघड झाला आहे. त्यावेळी मुलीने सांगितली आपबिती

घरच्यांनीच केला लेकीच्या आय़ुष्याचा खेळ
याबाबत सविस्तर घटना अशी की, करंजवण (दिंडोरी) येथे सुदाम शंकर पंडित यांच्या घरी त्यांचे जावई संजय बिडवे, मुलगी संगीता संजय बिडवे, नातू किरण संजय बिडवे सर्व (रा. खंबाळेवाडी,) घोटी, तालुका. इगतपुरी आणि अल्पवयीन मुलगी रेणुका हिची आई ज्योती पितांबर जाधव (रा.लखमापुर) यांनी करंजवण येथे सुदाम पंडित यांचे घराच्या पडवीत २ मे  २०२० रोजी मुलगी रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे यांच्याशी चोरीछुपे लावला होता.

मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड

दरम्यान  रेणुका, तिची सासु संगीता बिडवे, सासरा संजय बिडवे, नवरा किरण बिडवे हे खंबाळेवाडी ( घोटी) येथून सुदाम शंकर पंडित हे मयत झाल्याने त्यांचे विधीसाठी करंजवन, ता. दिंडोरी  येथे २४ नोव्हेंबर २०२० रोजी आले होते,यावेळी पहाटे गरम पाण्याचा ड्रम सांडल्याने रेणुकाच्या अंगाखाली गरम पाणी जाऊन त्यांच्या पाठीचे भागाला जळून त्यांना दुखापती झाल्या होत्या.  अल्पवयीन मुलगी गरम पाण्याने जळून जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू असतांना पोलिसांनी तसेच बाल कल्याण समिती नाशिकच्या वतीने मुलीचे जबाब घेतले, त्यावेळी मुलगी रेणुका हिचा बालविवाह झाल्याचा संशय आला. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. सोनवणे यांनी तसेच करंजवनचे ग्रामविकास अधिकारी अरूण आहेर यांना या प्रकाराची चौकशी केली.

चौकशीअंती बालविवाह झाल्याचे उघड

चौकशीअंती मुलगी रेणुका हिचा बालविवाह किरण संजय बिडवे याच्याशी चोरून झाला असे उघड झाले. याबाबत करंजवण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांच्या फिर्यादीवरुन नवरा किरण बिडवे, सासरा संजय बिडवे,  सासू संगिता संजय बिडवे, व आई ज्योती पितांबर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रतन पगार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. सोनवणे अधिक तपास करीत करीत आहेत.

बाल विवाह प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..

कोरोना साथरोग लॉकडाऊन काळात विवाहास शासनाची परवानगी नसतांनाही अल्पवयीन मुलीचे चोरुन लग्न लावून दिल्याप्रकरणी वणी पोलिसांत लग्न लावून देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताने अल्पवयीन मुलगी गरम पाण्याने जळून जखमी झाल्याने तपासाअंती सदरचा प्रकार उघड झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com