PHOTOS : COVID-19 : पाळणाघर विसावलं कोरोनाच्या खांद्यावर!

योगेश सोनवणे / हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

एकत्रित कुटुंबपद्धतीचा ऱ्हास अन्‌ दोघांना कमविण्याची गरज, यातून स्वत:च्याच अपत्यांच्या पालनपोषणाच्या प्रश्‍नाला पाळणाघरांतून उत्तर मिळाले खरे; पण वर्षानुवर्षे नेहमी सुरू असलेली पाळणाघरेही रविवारी (ता. 22) पहिल्यांदाच बंद दिसली. निमित्त होते जनता कर्फ्यूचे! एरवी पाळणाघरांतून ऐकावयास मिळणरे अंगाईगीत, लेकरांचे रडगाणे, खुदकन हसणे असो की फुगीर रुसणं... जनता कर्फ्यूमुळे सारे काही शांत-शांत आहे. यानिमित्ताने पाळणाघरांतील सर्व लेकरे मायबापाच्या कुशीत विसावली अन्‌ पाळणाघरातील "आई'ला देखील पहिल्यांदाच सुटी 

नाशिक : एकत्रित कुटुंबपद्धतीचा ऱ्हास अन्‌ दोघांना कमविण्याची गरज, यातून स्वत:च्याच अपत्यांच्या पालनपोषणाच्या प्रश्‍नाला पाळणाघरांतून उत्तर मिळाले खरे; पण वर्षानुवर्षे नेहमी सुरू असलेली पाळणाघरेही रविवारी (ता. 22) पहिल्यांदाच बंद दिसली. निमित्त होते जनता कर्फ्यूचे! एरवी पाळणाघरांतून ऐकावयास मिळणरे अंगाईगीत, लेकरांचे रडगाणे, खुदकन हसणे असो की फुगीर रुसणं... जनता कर्फ्यूमुळे सारे काही शांत-शांत आहे. यानिमित्ताने पाळणाघरांतील सर्व लेकरे मायबापाच्या कुशीत विसावली अन्‌ पाळणाघरातील "आई'लादेखील पहिल्यांदाच सुटी 

आजी-बाबांची जागा पाळणाघरांनी भरून काढली

लहानग्यांसाठी खरेतर संपूर्ण गल्लीच आपले हक्काचे घर असते. बोबड्या बोलाने आई-बाबांसह शेजारच्या आजी, मामा, काका, मावशी, काकू असे म्हणत आजोळ आणि घर दोन्ही एकाच गल्लीत उभे करावे ते या बाळांनीच. त्यामुळे रक्ताच्या पलीकडील ही नाती आपली होऊन जातात. कधीतरी हे बाळ मोठे झाल्यावर, दात पडलेली, हाताचा थरकाप होणारी "आजी' त्याला जवळ घेते. तू मोठा साहेब झाला पण, लहानपणी तुझे आई-बाबा तुला माझ्याच भरवशावर सोडून कामाला जायचे बरं! तुझी आजीच आहे मी, म्हणत गालाचा हळूच मुका घेणारी आजी मात्र आता हरवत चालली आहे. त्यामुळे आजच्या पिढीतील बाळांच्या हक्काच्या आजी-बाबांची जागा भरून काढली ती पाळणाघरांनी! 

No photo description available.

पाळणाघर सांभाळणाऱ्या आयांनाही इतिहासात पहिल्यांदाच विसावा

एरवी पाळणाघरात चक्कर मारला, की आपले आई-बाबा तर आले नसतील ना म्हणून प्रत्येकाची छबी न्याहाळणाऱ्या आशाळभूत नजरा मनाची कालवाकालव करतात. कामावरून परतीच्या मार्गावर असलेले आई-वडीलही जेव्हा पाळणाघरातून लेकरांना कुशीत घेतात, तेव्हा आभाळ कवेत घेतल्याचा आनंद त्यांना होतो. मात्र, दिवसभर आई म्हणून सगळी भूमिका पाळणाघरच पार पाडते. रविवारी सुटीच्या दिवशीही एखादे बाळ इथे सापडतेच. जनता कर्फ्यूने मात्र पाळणाघरे काही काळाकरिता शांत केली. यामुळे अर्थातच स्वतःच्याच घरट्यात आई-बाबा जवळ विसावताना या लेकरांना हा जनता कर्फ्यू संपूच नये, असेच वाटत असेल, यात शंका नाही! दुसरीकडे पाळणाघर सांभाळणाऱ्या आयांनाही इतिहासात पहिल्यांदाच विसावा मिळालाय. 

No photo description available.

हेही वाचा > भिंतीवर 'त्यांनी' लिहिले,"रामकुंडात अंघोळ करा, कोरोना नाहीसा होतो"...अन् गेले ना बाराच्या भावात!

 नाशिक शहर व परिसर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन झाला आहे. तत्पूर्वीच मी पाळणाघराला सुटी दिली आहे. लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना सुटी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्ही घाबरलो आहोत. - शिल्पा मेधणे, साईकृपा पाळणाघर, पारिजातनगर 

हेही वाचा >  COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

आमच्या पाळणाघरात नोकरदारांची मुले आहेत. पाळणाघरात मुलांची संपूर्ण काळजी घेत आहोत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हॅंडवॉश, सॅनिटायझरचा वापर करून स्वच्छतेची काळजी घेतलीड; परंतु सध्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाळणाघराला सुटी दिली आहे. - कविता चोथानी, अक्षर पाळणाघर, पंचवटी  

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children in the babysitting are spending time with their parents nashik marathi news