"आवो-जावो घर तुम्हारा. चाललयं काय?" प्रशासनाची नरमाई अन् नागरिकांचा संताप

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 4 June 2020

जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांचे आदेश फक्त कागदावरच राहिले आहे की काय असे सवाल होत आहेत.दरम्यान मुंबईहून आलेले पाहुणे पॉजीटीव्ह निघाल्याने पालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन सर्वेला सुरुवात केली आहे. एकीकडे सर्वांना सवलत आणि नियम डावलूनही दुर्लक्ष होत असताना शहरातील सर्वच सलून बंद ठेवल्याने सलून चालकांतून देखील या दुजाभावामुळे संताप व्यक्त होत आहे. 

नाशिक / येवला : बुधवारी मुंबईहून येथे आलेल्या दोघा पती-पत्नींचा तर आज पुन्हा एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या वाढतच असून पुन्हा एकदा येवलेकरांचे धाबे दणाणले आहे. कागदपत्रे मिरवणाऱ्या येथील प्रशासनाच्या नरमाईच्या आणि दुर्लक्षितपणाच्या भूमिकेमुळे आवो-जावो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगाव,नाशिक,मुंबई,औरंगाबाद,पुणे असे सगळीकडून येथे लोक येऊ लागले असून त्यामुळे येथील आकडा पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.आनंदाची बाब म्हणजे बरे झालेल्या ८ जणांना आज घरी पाठवण्यात आले आहे.

नियमाचा फज्जा उडाला
येवल्यात जिल्हाधिकाऱ्यांनी विविध अटी-शर्ती घालून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी अनेक दुकानदार सायंकाळी पाच वाजेनंतरही दुकाने सुरू ठेवत आहेत. शिवाय सर्वच दुकानात सोशल डिस्टन्सिंग व मास्क लावण्याच्या नियमाचा फज्जा उडाला असून मंगळवारी शहरात आठवडे बाजारात भरल्याचे अन आजही गर्दीचे चित्र सर्वत्र होते.प्रशासनात एकसूत्रता नसल्याने आजही एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम सुरू असून शहरात कोणीही विनापरवानगी येऊन राहत असल्याने अजूनच धास्ती वाटत आहे.

दुजाभावामुळे संताप

त्यामुळे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांचे आदेश फक्त कागदावरच राहिले आहे की काय असे सवाल होत आहेत.दरम्यान मुंबईहून आलेले पाहुणे पॉजीटीव्ह निघाल्याने पालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन सर्वेला सुरुवात केली आहे. एकीकडे सर्वांना सवलत आणि नियम डावलूनही दुर्लक्ष होत असताना शहरातील सर्वच सलून बंद ठेवल्याने सलून चालकांतून देखील या दुजाभावामुळे संताप व्यक्त होत आहे. 

पाहुणे निघाले पॉजीटीव्ह... 
गेल्या आठवड्याय मुंबईहून येथील बुरुड गल्लीतील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे आलेले पती-पत्नी येथे आले होते.त्यांचा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्याने व हा परिसर वर्दळीचा असल्याने पुन्हा धाकधूक वाढली आहे.तर आज शहरातील मोरेवस्ती वरील एक कारागीर (मिस्तरी) पॉझिटिव्ह निघाला असून त्रास होऊ लागल्याने दोन दिवसापासून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.अजुन एक रुग्ण संशयीत नाशिक येथे उपचारासाठी दाखल असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

८ जण झाले बरे...
दरम्यान, बाभूळगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या येथील आठही  रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता येथे एकही रुग्ण राहिलेला नाही.मात्र काल बुधवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या पती-पत्नीची तब्येत खालावल्याने त्यांनाही नाशिक येथे पाठवून दिल्याने आता येथील चार रुग्ण नाशिक येथे उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक शैलजा कुप्पास्वामी यांनी दिली.

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!
.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens anger for softening of administration in yeola nashik marathi news