धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवत सुरु होती त्यांची मनमानी...केंद्र शासनाने व राज्य शासनाने हॉटेल उघडण्यावर बंदी घातली असतांनादेखील हॉटेल प्रशासनाने हॉटेल सर्रास सुरु ठेवले होते...अन् जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा धक्काच...

नाशिक : (इगतपुरी) शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवत सुरु होती त्यांची मनमानी...केंद्र शासनाने व राज्य शासनाने हॉटेल उघडण्यावर बंदी घातली असतांनादेखील हॉटेल प्रशासनाने हॉटेल सर्रास सुरु ठेवले होते...अन् जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा धक्काच...

असा आहे प्रकार

कोरोना काळात हॉटेल व तत्सम व्यवसाय बंद असताना तालुक्यातील बलायदुरी येथील रेनफॉरेस्ट हॉटेलवर इगतपुरी पोलिसांनी शनिवारी (ता. 27) रोजी छापा टाकत कलम 188 प्रमाणे कारवाई केली आहे. संपूर्ण देशात व राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र शासनाने व राज्य शासनाने हॉटेल उघडण्यावर बंदी घातली होती. तरी शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून शहरातील रेन फॉरेस्टच्या हॉटेल प्रशासनाने हॉटेल सर्रास सुरू ठेवले. याची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी चौकशी करुन येथे छापा टाकला. याबाबत पोलीस नाईक विनोद गोसावी यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे. 

Image may contain: outdoor

हेही वाचा > आनंदवार्ता! जिल्ह्यातील 'हे' चार तालुके झाले कोरोनामुक्‍त...एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

Image may contain: sky, mountain, outdoor and nature

50 ते 60 व-हाडी दाखल 

या हॉटेलमध्ये दि. 28 व 29 जुन रोजी लग्नाची बुकींग असल्याने आजच यातील काही 50 ते 60 व-हाडी दाखल झाले होते. तर या लग्नासाठी आपण शासनाची रितसर परवानगी घेतली असल्याची माहीती हॉटेल व्यवस्थापकाने दिली. त्याचप्रमाणे काही पर्यटक देखील येथे वास्तव्यास असल्याचे दिसून आले. यावेळी सदर हॉटेलात पोलिसांनी येथे आलेल्या वाहनाची कडक तपासणी करून वाहनांवर दंडात्मक कार्यवाही केली. तसेच या हॉटेलवर कलम 188 नुसार कारवाही केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद गोसावी, दत्तात्रय जाधव, सचिन देसले, मारूती बोराडे आदी करीत आहे.

हेही वाचा > VIDEO : अमर रहे..वीरजवान सचिन मोरे अमर रहे..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: City police raid on Rain Forest Hotel in Igatpuri taluka nashik marathi news