#Lockdown : चेकपोस्ट व इगतपुरी रेल्वे स्टेशनवर परप्रांतीयांचे लोंढेच लोंढे; घरी जाण्यासाठी महामार्गाने पायी प्रवास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

प्रवासी वाहन न मिळाल्याने मुंबई-आग्रा महामार्गाने रविवारी (ता.२९ रोजी) सकाळी पायी चालत इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने हे परप्रांतीय जमा झाले. ते सर्व रेल्वे स्टेशनवर रिकामी उभी असलेली गोरखपुर काशी एक्स्प्रेसमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तर हजारो नागरिक छुप्या पध्दतीने खाजगी वाहनांने पुढे नाशिककडे गेल्याचे समजते. परंतु रेल्वे सेवा ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने येथील रेल्वे स्टेशन मास्तर प्रेमचंद आर्या यांना ही रेल्वे गाडीपुढे सोडविण्यासाठी परवानगी देण्यात आली नसल्याने ही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी दिली आहे. 

नाशिक : (इगतपुरी) मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर आदी ठिकाणचे परप्रांतीय कामगार हे आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई - आग्रा महामार्गाने निघाले आहेत. त्यांना प्रवासी वाहन न मिळाल्याने मुंबई-आग्रा महामार्गाने रविवारी (ता.२९ रोजी) सकाळी पायी चालत इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने हे परप्रांतीय जमा झाले. ते सर्व रेल्वे स्टेशनवर रिकामी उभी असलेली गोरखपुर काशी एक्स्प्रेसमध्ये ठाण मांडून बसले आहेत. परंतु रेल्वे सेवा ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने येथील रेल्वे स्टेशन मास्तर प्रेमचंद आर्या यांना ही रेल्वे गाडीपुढे सोडविण्यासाठी परवानगी देण्यात आली नसल्याने ही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी दिली आहे. 

ही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येणार

इगतपुरी शहरात जवळपास चार ते पाच हजार नागरिक एकाच वेळी शहरात आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना या जिवघेण्या व्हायरसने सध्या देशात थैमान घातले आहे. वाढत चाललेल्या या भयंकर विषाणूंच्या प्रार्दुभावामुळे देशातील व महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद करण्यात आल्यामुळे पर राज्यातील परप्रांतिय हाताला काम नसल्याने व जवळ पैसा नसल्याने मिळेल त्या वाहनाने चोरट्या मार्गाने आपल्या राज्यात आपआपल्या गावी जाण्यासाठी धडपड करीत आहे. मुंबईहुन रोज रिकाम्या एक्सप्रेस भुसावळला पाठवुन तेथे गाडी निर्जुंतुक करून ह्या गाड्या लखनऊ, कोलकत्ता, दिल्लीकडे पाठविण्यात येत आहेत. महामार्गाहुन चार ते पाच हजार नागरिक इगतपुरीत उभ्या असलेल्या लखनऊ एक्सप्रेसमध्ये बसले असुन या गाडीने पुढील प्रवास करता येईल व आप आपल्या राज्यात गावी जाता येईल या आशेवर बसले आहेत. परंतु रेल्वे सेवा ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने येथील रेल्वे स्टेशन मास्तर प्रेमचंद आर्या यांना ही रेल्वे गाडीपुढे सोडविण्यासाठी परवानगी देण्यात आली नसल्याने ही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी दिली आहे. 

Image may contain: train and outdoor

हेही वाचा > 'नाटा 2020' परीक्षा आता लॉकडाऊन संपल्यानंतरच; कौन्सिल ऑफ आर्किटेक्टचा निर्णय

प्रशासनाची ऊडाली धांदल 

सध्या ही गाडी इगतपुरी रेल्वे स्थानकात ऊभी असुन पुढील सुचना मिळेल तोपर्यंत सोडता येणार नाही असे रेल्वेच्या सुत्रांकडून समजते. दरम्यान हे परप्रांतीय सरळ महामार्गाने पायी प्रवास करुन कसारा घाटचढून घाटनदेवी मंदिराजवळील जिल्हाबंदी चेकपोस्ट वर एकच गर्दी केल्याने येथे तैनात असलेल्या पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील घाटनदेवी मंदीराजवळ असलेल्या चेकपोस्ट येथे स्वत: तहसीलदार अर्चना पागीरे व पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी तळ ठोकुन आहेत. सर्व वाहनांची कसुन चौकशी केली जात असून अत्यावश्यक वाहनांनाच नाशिकडे सोडले जात आहे. विनाकारण प्रवास करणाऱ्या वाहनांना पुन्हा मुंबईच्या दिशेने पाठवुन देण्यात येत आहे. मात्र या वाहनातील प्रवासी येथेच उतरुन थेट नाशिकच्या दिशेने भरऊन्हात पायी प्रवास करीत असल्याने प्रशासनाची धांदल ऊडाली आहे.

Image may contain: one or more people, crowd and outdoor

हेही वाचा > भयानक! 'माझा माल सिल्वासा येथे का पाठवला नाही!'...अन् रागाच्या भरात त्याने चक्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The city is worried by the crowds of other Provincial at the checkpost and Igatpuri railway station nashik marathi news