मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा योग्य उमेदवारांना लाभ मिळावा : जिल्हाधिकारी 

suraj mandhre
suraj mandhre

नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकणी नोकऱ्यांचा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून योग्य उमेदवारांना लाभ मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बँकर्स सोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक सतीश भामरे, अग्रणी बँक व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर, जिल्हा उद्योग निरीक्षक सीमा पवार, प्रकाश घुगे आदी उपस्थित होते.

उदाहरणे प्रसिद्ध केली पाहिजे

पुढे बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, तरुण वर्गाला रोजगार मिळण्याच्या अनेक वाटा आहेत; त्या त्यांच्या समोर आणल्या पाहिजे. या वाटा निवडताना त्यांना कोणत्या गोष्टी आपल्यामार्फत उपलब्ध करून देता येईल त्या सुलभ रीतीने उपलब्ध होणे देखील महत्त्वाचे आहे. तसेच अशा वेगळ्या वाटा चोखाळून ज्या तरुण-तरुणींनी आदर्श निर्माण केला आहे ती उदाहरणे जागोजागी प्रसिद्ध केली पाहिजे जेणेकरून इतर तरुण-तरुणी सुद्धा केवळ नोकरीच्या मृगजळामागे न धावता स्वतःच्या पायावर उभे राहतील. 

काटेकोरपणे उमेदवाराची छाननी

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आखण्याचा राज्य शासनाचा उद्देश हाच आहे की, तरुणांमधील कौशल्याला वाव मिळून त्यातून त्याचा रोजगार सुरू व्हावा. या अनुषंगाने लाभार्थी निवडताना आपण काटेकोरपणे उमेदवाराची छाननी केली पाहिजे. यापूर्वी लाभ मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांच्या यशकथा प्रसारित करून योजनेची प्रसिद्धी करण्यात यावी. त्यामुळे नवीन तरुणांना देखील या योजनेतून लाभ मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात असेल. बँकर्स आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना योजनेचा लाभ घेऊन रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यवसाय सुरू करणे सोयीचे ठरेल असा विश्वास देखील यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com