"कोर्टाची पायरी न चढण्याची लोकभावना खोटी ठरावी"

Uddhav-Thackeray.jpg
Uddhav-Thackeray.jpg

नाशिक : न्यायपालिकेने व्यवस्थेच्या चुका दाखवाव्यात; पण माझ्या मते, न्यायालयाच्या इमारतींची गरजच असता कामा नये. त्यापेक्षा गुन्हे कमी व्हावेत. खटले त्वरित मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. गुन्हे घडणारच नाहीत, असा समाज घडविण्याची गरज आहे. तसे न झाल्यास न्यायालयाच्या इमारती कमी पडतील. गुन्हेगारांची बाजू घेऊन खटले लढू नका, असे म्हणणार नाही; पण आपली बाजू घेणारे कोणी नाही, हे जेव्हा गुन्हेगारांना कळेल, तेव्हा गुन्हे कमी होतील. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, ही सामान्यांच्या मनातील लोकभावना आता खोटी ठरविता येईल. न्यायपालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. 16) येथे केले. 

की मी इथे कोर्टाची पायरी चढलेलो नाही. इमारतीचे भूमिपूजन फक्त केले

नाशिकमध्ये अडीच एकर जागेवर जिल्हा न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 
मुख्यमंत्री म्हणाले, की मी इथे कोर्टाची पायरी चढलेलो नाही. इमारतीचे भूमिपूजन फक्त केले. लोकार्पणालाही मी येणार. तोपर्यंत याच पदावर राहीन. मुख्यमंत्री असण्याबरोबरच मी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. इथले अनेक वकील माझ्या शिवसैनिकांना ओळखत असतील. न्यायमूर्ती हा रामशास्त्री प्रभुणेंसारखा असावा. न्यायासमोर तुम्ही कुणीही असा, राजा असला तरी मुलाहिजा न बाळगणारे न्यायाधीश हवेत. महाराष्ट्रात देशातील पहिले न्यायमूर्ती घडविणारे विद्यापीठ होणार असेल तर त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. राज्याला सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जे-जे करता येईल ते-ते मी करेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. जिल्हा सत्र न्यायाधीश वाघवसे यांनी इमारतीच्या रचनेची माहिती दिली. समन्वयक ऍड. जायभावे यांनी प्रास्ताविक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com