दिवाळीनंतर क्‍लासेस सुरू करूच; क्‍लासचालकांची तयारी, सकारात्‍मक निर्णयाची अपेक्षा 

coaching classes.jpg
coaching classes.jpg

नाशिक / कापडणे : नोव्‍हेंबरमध्ये खासगी कोचिंग क्‍लासेस सुरू करण्याची परवानगी देण्याचे आश्‍वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्‍यासह विविध लोकप्रतिनिधींनी दिले. मात्र, अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी याबाबत सकारात्‍मक निर्णय न झाल्‍यास दिवाळीनंतर परवानगीशिवाय क्‍लासेस सुरू करण्याची तयारी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील क्‍लासेसचालकांनी केली आहे. याबाबत संघटनेच्या बैठकीत निर्णय होऊन सरकारने काही कारवाई केल्यास त्यास सर्व क्लासेस संचालक एकत्रितरित्‍या तोंड देतील असे निश्‍चित केले आहे. 

दिवाळीनंतर क्‍लासेस सुरू करूच
लॉकडाऊनच्या काळात क्लासच्या जागेचे भाडे, कर्जाचे हप्ते, शिक्षक- कर्मचाऱ्यांचे पगार, इतर घरगुती व आजारपणाचे खर्च यामुळे अनेक क्लासेसचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ऑनलाइनला प्रतिसाद मिळत नाही. पालक व विद्यार्थी प्रत्यक्ष शिकवणी घेण्यासाठी तयार आहेत. आता रुग्णसंख्या व मृत्यू संख्याही घटली आहे. इतर सर्व व्यवसायांप्रमाणे, सर्व नियम व अटी लागू करुन, कमीतकमी विद्यार्थी संख्येने क्लासेस घेण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे. आश्‍वासनांशिवाय पदरी काही न पडल्याने अखेर, पालक व विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर, सोशल डिस्टंन्सिग ठेवून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून, स्वतःची व विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेऊन दिवाळीनंतर परवानगीशिवाय क्लासेस सुरु करण्याची तयारी क्लासेसचालकांकडून सुरू झाली आहे. 

क्‍लासचालकांची तयारी, सकारात्‍मक निर्णयाची अपेक्षा 
क्‍लासचालकांच्‍या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष अरुण कुशारे, मुकुंद रनाळकर, कैलास खताळे, अण्णासाहेब नरुटे, विवेक भोर, वाल्मिक सानप, शशिकांत तिडके, संजय अभंग, अतुल आचलिया, कैलास देसले, लोकेश पारख, प्रकाश डोशी, शिवाजीराव कांडेकर, यशवंत बोरसे, सचिन जाधव, ज्योती हिरे, रोहिणी भामरे, पुनम कांडेकर-ढोकळे आदी उपस्‍थित होते. तर, मोजके विद्यार्थी, सोशल डिस्टन्स, सॅनेटायझरची सुविधा आदी बाबी पाळून क्लास सुरु करण्यास दिवाळीनंतर परवानगी मिळेल, अशी अपेक्षा कापडणे येथील क्लास चालक योगीता पाटील, योगीता बोरसे, पंकज पाटील, जगन्नाथ पाटील, दिनकर माळी आदींनी व्यक्त केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com