
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये केवळ चार-सहा दिवस नाशिकचे किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. अन्य दिवस मात्र सामान्य तापमान राहात असल्याने यंदा नाशिककरांना गारठ्याचा आनंद घेता आला नाही. गारठा तर नाहीच. मात्र, तीन दिवसांपासून सायंकाळी होणाऱ्या अवकाळी पावसाने नाशिककरांपुढे अनोखे कोडे निर्माण केले.
नाशिक : यंदाच्या हिवाळी हंगामात काही दिवस वगळता अन्य दिवशी वातावरणातील गारवा गायब झाल्याची अनुभूती नाशिककरांना आली. काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानात वाढ झाली असून, किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. रविवारी (ता. १०) किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदविले असून, वातावरणातील थंडी पूर्णपणे गायब झाली आहे.
थंडी गायब, किमान तापमान १८.४ अंशावर
दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे हे बदल होत असल्याचे सांगितले जात आहे. सध्याच्या वातावरणात आरोग्य सांभाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. गेल्या पावसाळ्यात जोरदार पावसाची नोंद झाल्यानंतर या वर्षी हिवाळ्यात कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, वातावरणातील बदलांमुळे हा अंदाज खोटा ठरला आहे.
ढगाळ वातावरणामुळे पारा वाढला;
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये केवळ चार-सहा दिवस नाशिकचे किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. अन्य दिवस मात्र सामान्य तापमान राहात असल्याने यंदा नाशिककरांना गारठ्याचा आनंद घेता आला नाही. गारठा तर नाहीच. मात्र, तीन दिवसांपासून सायंकाळी होणाऱ्या अवकाळी पावसाने नाशिककरांपुढे अनोखे कोडे निर्माण केले. रविवारी (ता.१०) किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस राहिले, तर कमाल तापमान ३०.२ अंश सेल्सिअस होते.
हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार
आरोग्य सांभाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
दरम्यान, शनिवारी (ता. ९) नाशिकमध्ये १६.२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्यात नोंदविली. मकरसंक्रांतीनंतर थंडीत घट होत जात असल्याचे बोलले जात असले, तरी यंदा या सणानंतर थंडी वाढते की पारा घसरतो, याचा अंदाज नाशिककरांकडून बांधला जात आहे.
हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप
गेल्या आठवड्याभरातील किमान व कमाल वातावरण असे
(अंश सेल्सिअसमध्ये)
तारीख किमान कमाल
४ जानेवारी १८.६ २८.२
५ जानेवारी १७.४ २८.२
६ जानेवारी १७.२ ३०.२
७ जानेवारी १७.४ २८.४
८ जानेवारी १९.७ २६.१
९ जानेवारी २०.० २९.३
१० जानेवारी १८.४ ३०.२