esakal | विकासकामे मार्च अखेर पूर्ण करा; जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

Complete the development work by the end of March nashik news

विभागांनी निधी खर्चाचे नियोजन तात्काळ करावे. मार्च २०२१ अखेर पूर्णपणे खर्च होईल याची काळजी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सोमवारी (ता.५) दिले. 

विकासकामे मार्च अखेर पूर्ण करा; जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना संसर्गामुळे जिल्हा परिषदेस आरोग्य विभाग वगळता इतर विभागांना जिल्हा नियोजन मंडळ अथवा जिल्हा परिषद सेस निधीतंर्गत विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे २०१९-२० मधील प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश प्राप्त झाले अथवा निधी खर्चाचे नियोजन बाकी आहेत, अशा विभागांनी निधी खर्चाचे नियोजन तात्काळ करावे. मार्च २०२१ अखेर पूर्णपणे खर्च होईल याची काळजी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सोमवारी (ता.५) दिले. 

जिल्ह्यातील विकास कामांच्या आढावा बैठकीत क्षीरसागर बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव आदी उपस्थित होते. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपील आहेर यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाची तपासणी आशा कार्यकर्ती व आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती दिली. आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणाचा आढावा बैठकीत त्यांनी दिली. नवीन शाळा वर्गखोल्या बांधकामासाठी निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर नसून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत व ग्रामपंचायतस्तरावर पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून शाळा वर्गखोल्या दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रास नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यास सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या नवीन गुणवत्ता शैक्षणिक धोरणानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय एक याप्रमाणे पंधरा तालुक्यांमध्ये ‘मॉडेल स्कूल' तयार करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून एक शाळा सरकारला कळवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली. 

 हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

१७८ पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश 

ग्रामीण भागात एकूण १९२ नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. त्यापैकी १७८ पाणीपुरवठा योजनांच्या निविदा प्रक्रिया करून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित १४ पाणीपुरवठा योजनांचे कार्यारंभ आदेश या महिनाअखेर देण्यात येतील, अशी माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता दाभाडे यांनी बैठकीत दिली. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ