धक्कादायक! "परीक्षेत कॉप्या पुरविण्याप्रमाणेच इथे होताएत कोरोनाबाधितांचे लाड..?" कॉंग्रेसच्या नगरसेविकेची पोस्ट व्हायरल

hemlata patil 123.jpg
hemlata patil 123.jpg

नाशिक : "पूर्वी या वॉर्डमध्ये खुलेआम नातेवाईक जात येत असत. आता त्यात थोडी सुधारणा होऊन वॉर्डच्या बाहेरील खिडकी मधून गप्पा/टप्पा आणि सर्रासपणे वस्तुंची देवाणघेवाण सुरू असते. अक्षरशः माणसांची जत्राच असते. खेडेगावात नाही का, परीक्षेमध्ये कॉप्या पुरविण्यास हितचिंतक/आप्तेष्ट गोळा होऊन खिडक्यांमधून, इतर खुष्कीच्या मार्गाने कॉप्या पुरवितात अगदी `सेम टू सेम` तसेच." असे सांगत कोरोना पार्श्वभूमीवर काळजी व्यक्त करणारे छायाचित्र व पोस्ट कॉंग्रेसच्या नगरसेविकेने आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केली आहे. ती पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

काय म्हणताएत नगरसेविका डॉ. हेमलता पाटील? चिंता व्यक्त करणारी पोस्ट होतेय व्हायरल
राज्यातील तिसरे कोरोना हॅाटस्पॅाट म्हणून नाशिकची चर्चा सुरु झाली आहे. येथील कोरोना कक्षातील रुग्णांना भेटण्यास नातेवाईक, नागरिकांची अक्षरशः झुंबड असते. खेडयात दहावीच्या परिक्षेला कॅापी पुरवण्यासाठी आप्तेष्ट जमावेत तसे. नंतर हेच लोक परतल्यावर परिसरात कोरोनाची `गिफ्ट` वाटतात. याला कोण प्रतिबंध करणार? अन्यथा कोरोना कक्षच प्रसार केंद्र होण्याचा धोका आहे. यासंदर्भात कॉंग्रेसच्या जागरुक व संवेदनशील नगरसेविका डॉ. हेमलता पाटील रोजच या घटनेच्या साक्षीदार होतात. तेच चित्र त्यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

हे नातेवाईक मग घरोघरी शेजारी पाजारी करोना गिफ्ट करतात. आपण मग यंत्रणेला लाखोली वहात राहतो. आरोप, प्रत्यारोपाच्या नुसत्या फैरी झडतात. नाशिक बंद करा हा जयघोष होतो. ते बंद करायला हवे पण आपल्या जबाबदारीचे काय? आणि ते केव्हापर्यंत व कुठे कुठे बंद करायचे?. आधी कंटेनमेंट झोन तीन किलोमीटर पर्यंत होते. त्यावर प्रचंड बोंबाबोंब झाली. आता ते बिल्डिंग सील करण्यापर्यंतच्या मायक्रो लेव्हल ला आले. बिल्डींग सील झाली,  की दुस-या दिवशी बिल्डिंग मधले सगळे रस्त्यावर. परवा तर होम कॉरंटाईन केलेल्या पेशंटचा भाऊ मला गोल्फ क्लबला भेटला. मला पाहिल्या नंतर त्याने डोक्यावर मफलर गुंडाळून घेतली. आता मी काय गुंड आहे का?. मला पाहून मफलर गुंडाळायला? मी अत्यंत निरूपद्रवी प्राणी आहे .पण ज्याचा त्याने हा विचार करावा, की तुमच्या घरात करोना असताना तुम्ही असे बाहेर मोकाट फिरायला लागले, तर कोणती यंत्रणा तुम्हाला घरात कोंडणार?

कोण कोण तुमच्यावर लक्ष ठेवणार?
समाज कल्याण इथल्या कॉरेंटाईन सेंटरविषयी तक्रारी होत्या. त्यामध्ये तथ्य होते. त्यामुळे स्वतः आयुक्तांनी किट घालून तिथे अचानक भेट दिली. महापालिका, शासन यंत्रणा परिपूर्ण नाहीच. ती असूही शकणार नाही, पण अशा वेळी सतत तीचे वाभाडे काढून साध्य काय होणार आहे?.

प्रत्येकाचीच जबाबदारी

खरे तर प्रत्येकानेच जबाबदारी ने वागले पाहीजे. शासकिय संभ्रमामुळे नागरिकांचा कल आजार लपविण्या कडे जास्त आहे त्यामुळे आपल्या भोवती रोज फिरणारे हे मानवी बॉम्ब हा आजार जोमाने पसरवित आहेत. खाजगी अशा वेळी प्रत्येकांने जर स्वतः ची आचारसंहिता काटेकोरपणे पाळली तर कितीतरी प्रश्नांची उत्तरे सोपी होतील. लोकप्रतिनिधींनी उगीचच सवंग प्रसिद्धीसाठी आरोपांच्या फैरी एकमेकावर झाडण्या पेक्षा ग्राउंड वर उतरून काम केले पाहीजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com