"सानपांचा भाजप प्रवेश म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न" काँग्रेस नेत्याचा घणाघात 

sanap 1.jpg
sanap 1.jpg

पंचवटी (नाशिक) : माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा भाजप प्रवेश म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका करत आगामी मनपा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास पंचवटीतील प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

भाजपला महानगरपालिकेची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न
विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापले गेले तेव्हा बंडखोरी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी करत भाजपच्या नेत्यांना शह देण्याचा प्रयत्न केला.परंतु मतदारांनी त्यांना नाकारले नंतर निवडणुकीचा उत्साह संपताच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने शिवसेनेत प्रवेश करून भाजपला महानगरपालिकेची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला. 

आत्मविश्वासाच्या जोरावर केलेला प्रयत्न अंगलट
फाजील आत्मविश्वासाच्या जोरावर केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला आणि भाजपचा महापौर झाल्याने बाळासाहेब सानापांची कोंडी झाली. महापालिकेत २० वर्षापासून बसलेले बस्तान गेल्याने बैचैन होते. शिवसेनेत निष्ठावान शिवसैनिकांपुढे टिकाव लागत नसल्याने सत्तेविना करमेना अशी स्थिती निर्माण झाली असल्याने सानप यांनी भाजप प्रवेश केल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. 

भ्रष्टाचाराचे समर्थन करण्याचे ठरवले कि काय?
मागीलवर्षी निवडणुकीत बाळसाहेब सानप यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आता पुन्हा त्यांना पक्षांत प्रवेश देऊन पवित्र करून घेऊन भ्रष्टाचाराचे समर्थन करण्याचे ठरवले कि काय असा प्रश्न आता सर्वसामन्यांना पडला असून अशी हि नौटंकी येणाऱ्या काळात जनता स्वीकारणार नाही, शिवाय येणाऱ्या मनपा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असे मत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राऊत यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com