कोरोना तपासणीसाठी 'या' क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन..मिशन झीरोअंतर्गत बाराशेच्या वर तपासणी

corona test 1234.jpg
corona test 1234.jpg

नाशिक : भाजपसह महापालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे मिशन झीरोअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या तपासणी मोहिमेच्या तेराव्या दिवशी १ हजार २४६ नागरिकांच्या तपासणी करण्यात आली. त्यात १७५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या.

२ हजार २७६ पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध

कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी ८६६९६६८८०७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सातपूर भागातील अशोकनगर, ध्रुवनगर, सिडकोतील सावतानगर, राणाप्रताप चौक, पंचवटीतील दत्तनगर, पेठ रस्ता, सरदार चौक, कुमावतनगर, आडगाव नाका, रामवाडी, जुने नाशिकमधील सोमवार पेठ, प्रमोद महाजन उद्यान, मखमलाबाद नाका, नाशिक रोड येथील दत्त मंदिर, जयभवानी रोड, मोरवाडी, काठे गल्ली, चेहेडी, मुंबई नाका या भागात मोहीम राबविण्यात आली. २५ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनद्वरे नागररिकांची तपासणी करण्यात आली. तेरा दिवसात २१ हजार ३८२ रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट होऊन २ हजार २७६ पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. पॉझिटिव्ह रुग्णांचा लवकर शोध घेणे, त्यांच्यावर उपचार करणे, समुपदेशन करण्याचे काम करण्यात आले.

कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहकार्य करण्याचे आवाहन

कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहकार्य करण्याचे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, यतीश डुंगरवाल, सुनील चोपडा, गोटू चोरडिया, ललित सुराणा, रोशन टाटिया, संदीप ललवाणी, डॉ. उल्हास कुटे, डॉ. भागवत सहाणे यांनी केले.

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com