PHOTOS : चांदवडला कंटेनर आणि कारला भीषण अपघात; कंटेनर चालक जखमी

भाऊसाहेब गोसावी
Saturday, 16 January 2021

मुंबई - आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटातील घटना. मुंबईकडून येणाऱ्या कंटेनरने गतीरोधकावर एका कारला पाठीमागून धडक दिल्याने कंटेनर पलटी झाला. यात कंटेनर चालक जखमी झाला असून कार व कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.

चांदवड (नाशिक) : मुंबई - आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटातील घटना. मुंबईकडून येणाऱ्या कंटेनरने गतीरोधकावर एका कारला पाठीमागून धडक दिल्याने कंटेनर पलटी झाला. यात कंटेनर चालक जखमी झाला असून कार व कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.

अशी आहे घटना

मुंबई - आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात मुंबईकडून येणाऱ्या कंटेनर (आर जे ०१, जी सी १४४७) या वाहनाने गतीरोधकावर एका कारला पाठीमागून धडक दिल्याने कंटेनर पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून. तो एक तास कंटेनरमध्ये अडकला होता. सोमा कंपनीच्या पेट्रोलींग टीमचे शैलेंद्र अहिरे, विनोद बागूल, तुषार बोरसे, किरण वाघ, समाधान शिंदे, विष्णु सुर्यवंशी, प्रकाश मैधुणे, मनिष मोरे, सुनील बच्छाल, मंगेश पवार हे कर्मचारी व पोलीस हवालदार सोळंकी, मोरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न करीत चालकाला बाहेर काढून चांदवड येथील रुग्णालयात दाखल केले. 

Image

Image

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

Image

Image

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

या अपघातात कंटेनर चालक जखमी असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. या अपघातानंतर चांदवड पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Container and car accident in Chandwads Rahud Ghat nashik marathi news