Sakal Impact : अखेर कंत्राटी कामगारांना मिळाली २० टक्के पगारवाढ; 'सकाळ' च्या बातमीचा दणका

नीलेश छाजेड
Thursday, 10 December 2020

सकाळ बातमीचा दणका आणि 95 टक्के कंत्राटदारांनी 20 टक्के पगार वाढ दिल्याने कामगारांमध्ये 30 वर्षात प्रथमच आनंदाचे वातावरण असून दैनिक 'सकाळ'ने याविषयी वेळोवेळी वार्तांकन छापल्यामुळे न्याय भेटला असल्याच्या भावना कामगारांनी बोलून दाखवल्या.

एकलहरे (नाशिक) : नाशिक वीज केंद्रात 70 ते 80 टक्के कामे हे कंत्राटी पध्दतीने केली जातात व त्याचे कुशल व अकुशल असा विभाग पाडले जातात.त्याकरिता व्यवस्थापनामार्फत परवानाधारक कंत्राटदारांना नेमणूक केली जाते. तसेच व्यवस्थापन हे दरवर्षी कंत्राटी कामगारांसाठी सुधारित पद्धतीने वेतनवाढ लागू करत असते व वेतनवाढ कामगारांना मिळावी याकरिता परिपत्रक काढत असते असे असताना सुद्धा कंत्राटदार मात्र कामगारांना सुधारित वेतनवाढ देत नाही.असा कंत्राटी कामगार संघटनेचा आरोप आहे. व्यवस्थापनाने कंत्राटदारांना बिले हे वाढीव दराने दिले आहेत तरीही कामगारांना वेतनवाढ नाही त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी आहे.

नाशिक वीज केंद्रात सकाळ बातमीचा परिणाम म्हणून 95 टक्के कंत्राटदारांना 20 टक्के वेतनवाढ लागू केली आहे. परंतु कंत्राटदारामध्ये कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन चा पदाधिकारी असलेले कंत्राटदारांना वेतनवाढ दिली नसल्याची चर्चा आहे.

दैनिक सकाळ च्या पाठपुराव्या ने नाशिक वीज केंद्रात काम करणारे कंत्राटी कामगारांच्या मासिक पगारात शासनाने जानेवारी 2020 पासुन मंजुर केलेली 20 टक्के पगारवाढ स्थानिक प्रशासनाने मंजुर केली असुन हे निव्वळ दै सकाळ च्या पाठपुराव्याने साध्य झाले त्या निमित्त सकाळ समुहाचे मनापासुन धन्यवाद.- भरत फणसे (कंत्राटी कामगार)

जवळपास बऱ्याच कामगारांना पगार वाढ भेटली असून उर्वरित कंत्राटदारांनी पगार वाढ दिली नाही त्यांची 2 दिवस वाट पाहू व त्यांच्या विरोधात कामगार आयुक्तांना तक्रार करणार आहोत.-कांताबाई पवार (कंत्राटी कामगार)

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contract workers got 20 percent pay rise nashik marathi news