राजेंच्या लाडक्या भाच्यामुळे संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यात घडला संवाद; रंगल्या तासन् तास गप्पा

संपत देवगिरे
Monday, 28 September 2020

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीसाठी छत्रपती, खासदार संभाजीराजे नुकतेच नाशिकच्या दौऱ्यावर होते. साताऱ्याचे छत्रपती, खासदार उदयनराजे यांच्या भगीनी मनीषाराजे पाटील नाशिकला असतात. उदयनराजे यांचे आजोळ देखील नाशिकचेच असल्याने त्यांचा या शहराशी विशेष जिव्हाळा आहे. मात्र त्याला रविवारच्या (ता.२७) संभाजीराजेंच्या दौऱ्याने वेगळा संदर्भ तयार झाला. काय घडले...

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीसाठी छत्रपती, खासदार संभाजीराजे नुकतेच नाशिकच्या दौऱ्यावर होते. साताऱ्याचे छत्रपती, खासदार उदयनराजे यांच्या भगीनी मनीषाराजे पाटील नाशिकला असतात. उदयनराजे यांचे आजोळ देखील नाशिकचेच असल्याने त्यांचा या शहराशी विशेष जिव्हाळा आहे. मात्र त्याला रविवारच्या (ता.२७) संभाजीराजेंच्या दौऱ्याने वेगळा संदर्भ तयार झाला. काय घडले...

आणि मग मामा- भाच्याच्या रंगल्या गप्पा...

छत्रपती, खासदार संभाजीराजे नुकतेच नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदयनराजेंचे भाचे यशराजे त्यांनी त्यांना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीस संभाजीराजे येणार असल्याने मनिषाराजे यांचे पुत्र यशराजे यांनी त्यांना अर्थात आपल्या मामाला फोन करुन तुम्ही आमच्या घरी आलेच पाहिजे, असा आग्रह केला होता.संभाजीराजे नाशिकला आले तरी यापूर्वी त्यांनी कधी उदयनराजेंच्या भगीनी मनिषाराजेंशी संपर्क केला नव्हता. त्यामुळे यावेळी तरी ते येणार की नाही, याविषयी साशंकता होती.

मात्र संभाजीराजे नाशिकला आल्यावर त्यांनी आपल्या भाच्याचा (यशराजे) हट्ट पुरविला. ते त्यांच्या घरी आले. भरपुर गप्पा मारल्या. एव्हढेच नव्हे तर दिवसभर ते त्यांना आपल्या गाडीत घेऊन फिरले. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत देखील यशराजे त्यांच्या समवेत पूर्णवेळ होते. संभाजीराजे हे यशराजे यांच्या आग्रहावरुन त्यांच्या घरी गेल्यावर उदयनराजेंच्या भगीनी मनिषाराजे आणि धनंजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी त्यांची विचारपूस केली. यशराजे नुकतेच लंडन येथून शिक्षण घेऊन परतले आहेत. त्याविषयी त्यांनी चौकशी केल्यावर यशराजेंच्या वाहनांच्या छंदावर मात्र ते भलतेच खुश झाले. कारण भाच्याचा हा छंद उदयनराजे आणि संभाजीराजे या दोन्ही मामांच्या छंदाशी मिळता जुळता होता.

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

आणि मग उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात संवाद घडलाच..

तो आग्रह पुर्ण करीत दिवसभर संभाजीराजेंनी आपले भाचे यशराजे यांच्यासमवेत घालविला.या मामा- भाच्यांत भरपुर गप्पा तर झाल्याच मात्र यावेळी यशराजे यांनी उदयनराजेंना फोनवर संपर्क करुन संभाजीराजेंचा संवादही घडवून आणला. या भाच्यालाही कार्सचा छंद असल्याने मामा अर्थात छत्रपती संभाजीराजे आणि यशराजे यांच्या छंदात साम्य निघाले. त्यामुळे कार्सविषयी रंगलेल्या त्यांच्या गप्पा दोघांसाठीही आनंददायक ठरल्या. यशराजेंनी घेतलेल्या नव्या मर्सीडीजची त्यांनी आवर्जुन माहिती घेतली. यावेळी त्यांनी वर्तमानपत्रांत, बातम्यांत सातारा आणि कोल्हापूर असा भेद उगीचच केला जातो. प्रत्यक्षात तसा भेद नाहीच. मी दिल्लीत असल्यावर उदयनराजेंच्या घरी आवरुज्न जातो. आम्ही नियमित भेटतो. भरपुर गप्पा होतात, असे सांगितले.

 हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

दोन्ही राजे बराच वेळ फोनवर.. 

याआधी यशराजे यांच्याकडे उदयनराजे यांनी देखील संभाजीराजे भेटले का? याची चौकशी केली होती. त्यामुळे यशराजे यांनी उदयनराजे यांना दुरध्वनीवरुन संपर्क केला. त्यानंतर त्यांनी संभाजीराजेंना फोन दिला. त्यानंतर हे दोन्ही राजे बराच वेळ फोनवर बोलत होते. संभाजीराजेंशी यशराजे यांची ही पहिलीच भेट होते. त्यामुळे या भेटीने खुपच आनंदीत झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः संभाजीराजे या भेटीने आनंदी होते. त्यांनी यासंदर्भात आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले, मी पहिल्यांदाच त्यांना भेटलो. आमच्यात घरगुती, जिव्हाळ्याचे संबंध आहेच. त्यामुळे भाच्याचा हट्ट पुरविला. दिवसभर आम्ही एकत्रच गाडीत फिरलो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conversation between Sambhaji Raje and Udayan Raje nashik marathi news