Corona Update : जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रूग्‍णांच्या संख्येत ५५८ ने वाढ; दिवसभरात ८५३ कोरोनामुक्‍त

अरुण मलाणी
Friday, 2 October 2020

शुक्रवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ८५१, नाशिक ग्रामीणचे ५५२, मालेगावचे २० तर जिल्‍हाबाह्य सात रूग्‍णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ५६७, नाशिक ग्रामीणचे २२१, मालेगाव ५७ आणि जिल्‍हाबाह्य आठ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली

नाशिक : जिल्‍ह्‍यात ॲक्‍टिव्‍ह रूग्‍णांच्या संख्येत वाढ होत असल्‍याने पुन्‍हा एकदा उपचार घेत असलेल्‍या बाधितांची संख्या दहा हजारांच्‍या उंबरठ्यावर पोहोचली आहे. शुक्रवारी (ता.२) दिवसभरात १ हजार ४३० नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर ८५३ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून १९ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत ५५८ ने वाढ झाली असून, सद्यस्‍थितीत ८ हजार ९५९ बाधितांवर जिल्‍ह्‍यात सध्या उपचार सुरू आहेत. 

बाधितांचा आकडा ७८ हजार ४१४ वर पोहोचला

शुक्रवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ८५१, नाशिक ग्रामीणचे ५५२, मालेगावचे २० तर जिल्‍हाबाह्य सात रूग्‍णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ५६७, नाशिक ग्रामीणचे २२१, मालेगाव ५७ आणि जिल्‍हाबाह्य आठ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. ऐकोणावीस मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणचे आठ आणि मालेगाव महापालिका हद्दीतील दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून आतापर्यंत जिल्‍ह्‍यात आढळलेल्‍या बाधितांचा आकडा ७८ हजार ४१४ वर पोहोचला आहे. यापैकी ६८ हजार ०४५ बाधितांनी कोरोनावर मात केली असून, १ हजार ४१० रूग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. 

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

दरम्‍यान दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २ हजार ३३०, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २३५, मालेगाव रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २९, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ९, व जिल्‍हा रूग्‍णालयात ८ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ७१८ अहवाल प्रलंबित होते. यापैकी क सर्वाधि१ हजार २५७ नाशिक ग्रामीण भागातील रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona active patients increased by 558 in nashik marathi news