गंभीर! तीन महिन्‍यांच्‍या चिमुकल्‍यासह आठ बळी; पुन्हा वाढले मृत्‍यूचे भय 

death body.jpg
death body.jpg

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचे प्रमाण पुन्‍हा एकदा वाढले आहे. सोमवारी (ता.२१) जिल्‍ह्‍यात आठ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. यात तीन महिन्‍यांच्‍या बाळाचा समावेश असून, आतापर्यंत सर्वात कमी वयातील हा बळी ठरला आहे. याशिवाय नाशिक ग्रामीण भागातील चार मृतांपैकी तीन रूग्‍ण हे निफाड तालुक्‍यातील आहेत. दरम्‍यान दिवसभरात ३५३ रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले असून, बरे होणार्या रूग्‍णांची संख्या ३४७ इतकी राहिली. 

जिल्‍हाबाहेरील एका रूग्‍णाचा मृत्‍यू
सोमवारी (ता.२१) झालेल्‍या आठ मृत्‍यूंपैकी तीन रूग्‍ण नाशिक शहरातील, चार नाशिक ग्रामीणमधील, तर जिल्‍हाबाहेरील एका रूग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. शहरातील तीन मृतांमध्ये आडगाव येथील तीन महिन्‍याचे बालक, द्वारका परीसरातील शंकरनगर येथील ५० वर्षीय पुरूष, देवळाली गावातील ७० वर्षीय महिला रूग्‍णाचा समावेश आहे. तर नाशिक ग्रामीण भागात पिंपळसरामाचे येथील ६५ वर्षीय पुरूष, लासलगाव येथील ७६ वर्षीय पुरूष, मुखेड येथील ८२ वर्षीय पुरूष अशा निफाड तालुक्‍यातील तीन रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. तर भायगाव (ता.मालेगाव) येथील ६४ वर्षीय महिला रूग्‍णाचा मृतांमध्ये समावेश आहे. जालनातील व सध्या नाशिकला उपचार घेत असलेल्‍या ८१ वर्षीय पुरूष रूग्‍णाचाही मृत्‍यू झाला आहे. 

सायंकाळी उशीरापर्यंत ६८५ अहवाल प्रलंबित
दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २७१, नाशिक ग्रामीणमधील ६९, मालेगावच्‍या ११ तर जिल्‍हाबाहेरील दोन रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहे. तर बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २६६, नाशिक ग्रामीणमधील ७९, जिल्‍हाबाहेरील दोन रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ८७५, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ३४, मालेगावला सात, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक, जिल्‍हा रूग्‍णालयात सात रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ६८५ अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर ​
२ हजार ७६५ बाधितांवर जिल्‍ह्‍यात उपचार सुरू 
दरम्‍यान जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १ लाख ७ हजार ५८६ झाला असून, यापैकी १ लाख २ हजार ९०४ रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्‍या मृतांचा आकडा १ हजार ९१७ वर पोहोचला असून, सध्या जिल्‍ह्‍यात उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या २ हजार ७६५ इतकी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com