नियतीचा खेळ! पोवाड्यातून गरजणाऱ्या आवाजावर उपासमारीची वेळ; कोरोनाने शाहिरांचा आवाज बंद?

दीपक अहिरे
Tuesday, 6 October 2020

एखादे संकट आयुष्याला अवघड वळण देऊ जाते. कलावंताचे जीवन, तर अधांतरितच असते. कोरोनामुळे लोककलावंतांसमोर मोठे संकट उभे केले आहे. या कोरोनामुळे पिंपळगाव बसवंत येथील शाहिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : एखादे संकट आयुष्याला अवघड वळण देऊ जाते. कलावंताचे जीवन, तर अधांतरितच असते. कोरोनामुळे लोककलावंतांसमोर मोठे संकट उभे केले आहे. या कोरोनामुळे पिंपळगाव बसवंत येथील शाहिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोवड्यातून गरजणाऱ्या आवाजावर उदरनिर्वाहासाठी आता भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. कोरोनापूर्वी डफाची थाप व पोवाडा गाजविणारे पिंपळगावचे शाहीर मधुकर जाधव आता भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करीत आहे. 

लोककलावंतांसमोर मोठे संकट
फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या मधुकर जाधव यांना पहाडी आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. खंडोबाचे जागरण-गोंधळ, गाणी, पोवडे यातून ते समाजप्रबोधन करायचे. अण्णा भाऊ साठे यांची गीते, भीमगीते, आदिवासी गीते, व्यसनमुक्ती व स्त्रीभ्रूण हत्येबाबत जनजागर अशा गीतप्रकारांतून त्यांनी रसिकांचे मनोरंजन व समाजप्रबोधन केले. शाहीर जाधव यांचा भारदस्त आवाज व डफ गरजायला लागला, की ऐकणाऱ्यांच्या नसानसांत स्फुरण चढायचे; पण कोरोनाने या शाहिराचा आवाज बंद केला आहे. शाहीर केवळ लावणी-पोवाडे गाऊन मनोरंजन करणारा कलावंत नसतो, तर आपल्या कलेद्वारे तो समाजप्रबोधनही करत असतो. कोरोनाच्या संकटामुळे शाहिराच्या आयुष्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. पिंपळगावचे शाहीर जाधव आता आठ जणांच्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहे. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

कलावंतांना आर्थिक मदत नाही
शाहीर व इतर कलावंतांसाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे दर वर्षी सुमारे ५० लाखांची तरतूद केली जाते. पण ती यंदा मिळाली नाही. कलावंतांना आर्थिक मदत न मिळाल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. त्यातूनच शाहीर जाधव यांनी भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेतला. ते भाजीपाला विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून आयुष्ट कंठत आहे. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect on shahir nashik marathi news