VIDEO : कोरोनाचे युध्द लढुनी परतला घरी! सोसायटी वासियांचे कृत्याचा VIDEO होतोय व्हायरल..

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 22 April 2020

नाशिकचा कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला होता. कोरोनाची लागण झाली असल्याने रुग्णाला (ता.६) एप्रिलला रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर हा रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यानंतर तो  घरी परतला तेव्हा तेथील रहिवासी आणि शेजाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्यांना अनेक सोसायट्या प्रवेश देण्यास नाखूश असतात. त्यामुळे सोसायटी वासीयांचे हे वर्तन अशा मंडळींच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

नाशिक : गोविंदनगर भागातील मनोहरनगरमध्ये कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला होता. कोरोनाची लागण झाली असल्याने रुग्णाला (ता.६) एप्रिलला रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर हा रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यानंतर तो  घरी परतला तेव्हा तेथील रहिवासी आणि शेजाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्यांना अनेक सोसायट्या प्रवेश देण्यास नाखूश असतात. त्यामुळे सोसायटी वासीयांचे हे वर्तन अशा मंडळींच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

टाळ्या वाजवत त्याच्या हिमतीला दाद​

जिल्ह्यात आढळलेला पहिला कोरोना रुग्ण आता कोरोनामुक्त झाल्याने त्याला मंगळवार (ता.१४) जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णाने डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच सर्वांनी त्याचे टाळ्या वाजवत त्याच्या हिमतीला दाद दिली. तो रुग्ण घरी परतल्यानंतर सोसायटीवासियांनी देखील टाळ्या वाजवून स्वागत केले. नाशिकच्या गोविंदनगर परिसरातील संशयीत रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट  (ता.४) पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर (ता.१८) त्याच पॉझिटिव्ह  रुग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या रिपोर्टमुळे सगळ्यांनाच दिलासा मिळाला. त्यानंतर रुग्णाचा तिसरा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त रुग्ण ठरला. सुमंगल सोसायटी, मनोहर नगर, गोविंदनगर परिसरात हा कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला. 

रुग्ण बरा झाला तरी 18 मेपर्यंत प्रतिबंध कायम 

गोविंदनगर भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयातून परतला असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 18 मेपर्यंत प्रतिबंध कायम राहणार असल्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढले आहेत. त्याचबरोबर शहरातील इतर पाचही प्रतिबंधित क्षेत्रदेखील 28 दिवसांसाठी प्रतिबंधित राहणार आहे. गोविंदनगर भागातील मनोहरनगरमध्ये कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर संबंधित रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर सुमंगल सोसायटीपासून तीन किलोमीटरचा परिसर 14 दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आला होता. प्रियंका नेस्ट अपार्टमेंट, इंदिरानगर बोगद्याजवळील जॉगिंग ट्रॅक, एचडीएफसी बॅंक, जनहित हॉस्पिटल, डॉ. आवारे हॉस्पिटल, डॉ. पिंप्रीकर क्‍लिनिक, अश्‍विनी हॉस्पिटल, वक्रतुंड एंटरप्रायजेस, भावसार भवन, न्यू इरा इंग्लिश स्कूलचा परिसर या तीन किलोमीटरच्या परिसरात आहेत. या भागात फक्त अत्यावश्‍यक सेवा पुरविल्या जात होत्या. नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. मनोहरनगरमधील रुग्णाचा अहवाल 14 दिवसांनंतर निगेटिव्ह आल्यानंतर या भागातील प्रतिबंधित क्षेत्र हटविले जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु प्रतिबंधित क्षेत्रासंदर्भात शासनाने नवीन आदेश काढले. रुग्ण बरा होऊन घरी परतला तरी पुढील 28 दिवसांपर्यंत संबंधित भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम ठेवण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार 18 मेपर्यंत गोविंदनगरचा भाग प्रतिबंधित म्हणून कायम राहणार आहे. 

सर्वत्र नियम सारखाच 
गोविंदनगरबरोबरच बजरंगवाडी, नाशिक रोडचा जलतरण तलाव परिसर, नवश्‍या गणपती मंदिर, अंबड येथील संजीवनगर या भागातही प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या भागातील रुग्ण घरी परतले, तरी येथेही 28 दिवसांपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

sakalmedia@SakalMediaNews

नाशिक : जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त रुग्णही निघाला घरी...गोविंदनगर येथील रुग्ण असून यावेळी रुग्णाने डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच सर्वांनी त्याचे टाळ्या वाजवत त्याच्या हिमतीला दाद दिली

Embedded video

40

Twitter Ads info and privacy

See sakalmedia's other Tweets

 

Sakal Nashik@SakalNashik

नाशिक : (ता.१४) एप्रिलला जिल्ह्यात आढळलेला पहिला कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज (ता.२०) नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोरोनामुक्त रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे...@SakalNashik

Embedded video

55

Twitter Ads info and privacy

See Sakal Nashik's other Tweets


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona-free patient was welcomed by the Society nashik marathi news