'एसटी'ला कोरोनाचा फटका; शालेय सहलींचे उत्पन्न आले शून्यावर

Corona has caused a big drop in ST revenue nashik marathi news
Corona has caused a big drop in ST revenue nashik marathi news

देवळा (जि. नाशिक) : कोरोना संकटामुळे या वर्षी शाळा बंद असल्याने शाळांच्या अभ्यास सहलीसुद्धा बंद आहेत. त्यामुळे या सहलींच्या विद्यार्थी प्रवासातून एसटीला मिळणारे उत्पादन शून्यावर आले आहे. 

केव्हा एकदा कोरोना जाईल..

दिवाळीनंतर डिसेंबर ते मार्चदरम्यान शाळा-विद्यालयांच्या सहलींचे हमखास आयोजन केले जाते. शाळेच्या शैक्षणिक उपक्रमाचा तो एक भाग असतो. या सहलींमधून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, वैज्ञानिक अशा अनेक घटकांची माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांचाही भरपूर प्रतिसाद मिळतो. मोठ्या शाळांना तीन-तीन, चार-चार बस कराव्या लागतात. मात्र यंदा कोरोनामुळे शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे सहली काढणे अशक्य असल्याने त्याचा मोठा फटका एसटीला बसला आहे. शाळांच्या सहली फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधूनच काढल्या जाव्यात, असे बंधनकारक असल्याने शाळांच्या जवळपासच्या डेपोची बस बुक केली जाते. प्रवासाचे दिवस, किलोमीटर, विद्यार्थिसंख्या, सहलीचा मार्ग यावरून पैसे जमा केले जायचे. यातून डेपोला लाखोंची कमाई होऊन एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळत असे. केव्हा एकदा कोरोना जाईल आणि पूर्वीचे दिवस येतील अशा भावना बसचालक मुरलीधर पगार यांनी व्यक्त केल्या. 

कळवण डेपोतील तीन वर्षांची आकडेवारी 

२०१८-१९ ः ४६ बसगाड्यांच्या माध्यमातून ३८,५०३ किलोमीटर प्रवास. २१ लाख ७६ हजार ४१४ रुपये व्यवसाय 
२०१९-२० : ११८ बस, १,२०,९०८ किलोमीटर प्रवास. ७४ लाख ५४ हजार ४१६ रुपये व्यवसाय 
२०२०-२१ : शून्य बस, शून्य किलोमीटर प्रवास, शून्य रुपये व्यवसाय 

छोटे रोजगारही ठप्प 

सहली न निघाल्याने एसटीला मोठा फटका बसलाच आहे. शिवाय सहलींमधून अनेक लहान व्यावसायिकांना हातभार लागत असे. त्यांचाही रोजगार ठप्प आहे. अनेक प्राणिसंग्रहालये, वस्तुसंग्रहालये, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, गडकिल्ले, धार्मिक स्थळे येथे विद्यार्थ्यांची गर्दी नसल्याने सुनेसुने दिसत आहेत. 

आम्ही दर वर्षी शालेय सहलींना बस देतो. यातून एसटीला लाखोंचा व्यवसाय मिळत असे. यंदा कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सहली नाहीत. त्यामुळे सहलींच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न यंदा शून्य आहे. 
-हेमंत पगार, आगार व्यवस्थापक, कळवण 

दर वर्षी शाळांच्या सहली गडावर येतात. त्यातून येथील सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांचा व्यवसाय होत असतो; परंतु यंदा तसे चित्र नसल्याने व्यावसायिक नाराज आहेत. 
-संदीप बेनके, सामाजिक कार्यकर्ते, सप्तशृंगगड वणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com