Coronavirus : अखेर प्रेसची सिक्‍युरिटी भेदून "कोविड-19''ने शिरकाव केलाच!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

नाशिकच्या इंडिया सिक्‍युरिटी प्रेसमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मुद्रणालयातील कर्मचारी बाधित सापडला आहे. प्रतिभूती मुद्रणालयातील केंद्रीय मुद्रांक डेपो (सीएसडी) विभागातील कोविड-19 विषाणूचा शिरकाव प्रशासनाने गंभीरपणे घेतला असून, सतर्क झालेल्या यंत्रणेने दोन दिवसांसाठी हा विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेत, निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेतले आहे.

नाशिक : नाशिकच्या इंडिया सिक्‍युरिटी प्रेसमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला असून मुद्रणालयातील कर्मचारी बाधित सापडला आहे. प्रतिभूती मुद्रणालयातील केंद्रीय मुद्रांक डेपो (सीएसडी) विभागातील कोविड-19 विषाणूचा शिरकाव प्रशासनाने गंभीरपणे घेतला असून, सतर्क झालेल्या यंत्रणेने दोन दिवसांसाठी हा विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेत, निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेतले आहे. 

मुद्रांकांचे देशभर वितरण

पारपत्रांसह (पासपोर्ट) नॉन ज्यूडिशल व विविध ज्यूडिशल स्टॅम्पची छपाई होणारा येथील प्रतिभूती मुद्रणालयातील सीएसडी विभाग महत्त्वाचा विभाग आहे. येथून देश-विदेशात, मुद्रांकांचे देशभर वितरण केले जाते. छपाई झालेले मुद्रांक डेपोत साठवून तेथून ते मागणी व शासकीय आदेशानुसार, देशभर वितरित होतात. याशिवाय इतरही अनेक कारणांनी अत्यंत संवेदनशील असलेल्या या सीएसडी विभागात लॉकडाउनमध्ये मोजक्‍या कर्मचाऱ्यांसह कामकाज सुरू आहे. मात्र आता या विभागातच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने दोन दिवस हा विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. साडेतीन हजारांवर कर्मचारी असलेल्या मुद्रणालयात खबरदारीचा उपाय म्हणून, महाव्यवस्थापकांनी तातडीचा आदेश काढला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

मुद्रांक डेपो दोन दिवस बंद

भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार सुरक्षेच्या कारणावरून या निर्णयाला दुजोरा देत, दोन दिवस विभाग बंद ठेवण्याला सहमती दर्शविली आहे. अद्याप मुद्रणालयात पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू नसतानाच, मुद्रांक डेपो दोन दिवस बंद राहणार आहे. सिक्‍युरिटी प्रेसमधील कोविड-19 विषाणूची दखल येथील यंत्रणेने गंभीरपणे घेतली असून, सतर्क झालेल्या यंत्रणेने विविध विभागांच्या निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेतले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection in an employee of the Securities Press nashik marathi news