भयंकर..आमरस खाण्यासाठी नाशिकच्या पाहुण्यांना खास निमंत्रण..अन् तिथेच झाला घात..! गावात दहशत..

mango juce  1.jpg
mango juce 1.jpg

नाशिक /  कसबे सुकेने  ः गावची लोकसंख्या मोठी असल्याने गेले तीन महिने ग्रामस्थांनी जीवाचे रान केले. मात्र गावातील एका कुटुंबाने आमरसाची मेजवानी ठेवली. त्यासाठी गावातीलच नव्हे तर नाशिकमधुनही पाहुण्यांना निमंत्रीत केले. तिथेच घात झाला...

असे घडले सारे

कोरोना कमिटी व ग्रामपंचायत प्रशासनाने कोणत्याही कुटुंबाने आपले नातेवाईकांना घरी बोलू नये किंवा आपणही कोरोना काळात कोणत्याही नातेवाईकांकडे जाऊ नये असे सांगितले होते. मात्र या कुटुंबाने हा सल्ला न ऐकल्याने त्या घरात कोरोनाची लागण झाली आहे. या कार्यक्रमासाठी नाशिकहुन पाहुणे आंबे रस खाण्यासाठी आले व कोरोनाची लागण करून निघून गेले. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहाजणांपैकी तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात एका 75 वर्षीय एका 55 वर्षीय एका 25 वर्षीय व्यक्तीला कोरोना ची लागण असून घरातील इतर तीन जणांना आता विलगीकरण कक्षात ठेवण्याची वेळ आली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी पंचक्रोशीत पसरल्याने गावात कोरोना ची दहशत निर्माण झाली आहे. 

आमरसाची हाव पडली महागात

गेल्या तीन महिन्यापासून कसबे सुकेने येथील कोरोना कमिटी, प्राथमिक आरोग्य केंद्र व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने मोठी लोकसंख्या असतानाही कोरोना या आजाराला गावापासून दूर ठेवले. मात्र गावाचे सारे प्रयत्न एका आंबेरस कार्यक्रमामुळे पाण्यात गेले. त्या मेजवानीसाठी हजेरी लावलेले तिघे पॉझीटीव्ह आढळताच ग्रामस्थांना धक्का बसला त्यामुळे आता पंचक्रोशीत आमरसाची हाव आणि कोरोनाचा शिरकाव अशी चर्चा सुरु आहे. 

गाव बंद करण्याची शक्‍यता

कालच या कुटुंबातील या तीन व्यक्तींना कोरोना सदृश्‍य हजाराची लक्षणे दिसू लागल्याने तात्काळ येथील स्थानिक डॉक्‍टरांनी त्यांना पिंपळगाव या ठिकाणी कोरोना नमुने देण्यासाठी पाठविले होते त्यांचा अहवाल आज आला. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाशी लढत असलेल्या स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली असून संपूर्ण गाव लवकरच काही काळ गाव बंद करण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

स्थानिक प्रशासन हादरले

यापूर्वीच शेजारील मौजे सुकेने येथे देखील एकाच कुटुंबातील चार रुग्ण कोरोना बाधित असून त्यांच्यावरही लासलगाव याठिकाणी कोव्हीड सेंटरमध्ये उपचार सुरु असून दोन्ही गावांमध्ये सध्या कोरोना रुग्ण असल्याने स्थानिक प्रशासन हादरले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com