कोरोनाने आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू..कोरोना काळात कर्तव्य बजावत बजावताना गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दुसरे बाधीत हवालदार शिंदे हे मात्र बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिंदे यांना टोंगारे यांनीच रुग्णालयात दाखल केले होते. अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.

नाशिक / इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अरुण टोंगारे (52) रा. वासन नगर यांचे कोरोना मुळे निधन झाले .तीन आठवड्यांपूर्वी त्यांना नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यासोबत बाधीत हवालदार शिंदे कोरोनामुक्त..पण टोंगारेंचा मृत्यू

त्यानंतर त्यांची पत्नी आणि दोघे मुलं देखील बाधीत झाली होती. मात्र उपचारा नंतर ते बरे झाले होते .5-6 दिवसांपूर्वी टोंगारे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले होते. दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर अंधेरी येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दुसरे बाधीत हवालदार शिंदे हे मात्र बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिंदे यांना टोंगारे यांनीच रुग्णालयात दाखल केले होते. अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना

टोंगारे च्या रूपातील एक कर्तव्य निपूण आणि भला माणूस इंदिरानगर पोलिस ठाण्याने कोरोना काळात कर्तव्य बजावत असतांना गमावला आहे. त्यांची कमी नेहमी जाणवेल अशा भावना वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona killed police constable nashik marathi news