सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने कोरोनाचा पराभव करावा - कृषिमंत्री भुसे

Corona should be defeated by the combined efforts of all says dada Bhuse
Corona should be defeated by the combined efforts of all says dada Bhuse

मालेगाव (जि. नाशिक) : देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या शहरांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश असल्याने ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना मोठ्या प्रमाणात पाय पसरत असून, प्रशासनाबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढील १५ दिवस परिश्रम घेऊन कोरोनाचा पराभव करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

भुसे म्हणाले, की ‘घाबरू नका पण काळजी घ्या’ हे ब्रीदवाक्य घेऊन जनजागृती करा आणि कामाला लागा. लोकप्रतिनिधींसह समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे लढा दिल्यास कोरोना संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. प्राथमिक पातळीवर उपचार घेतल्यास कोरोनाला अटकाव घालणे शक्य आहे. गृहविलगीकरणाच्या संकल्पनेवर अंकुश आणावा. गृहविलगीकरणातील रुग्णांनी काळजी घेत संसर्ग पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी. ग्रामपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांसह आरोग्य कर्मचारी रोज गावात उपस्थित राहिले पाहिजेत. जे कर्मचारी या निर्देशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 

तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांची आढावा सभा सोमवारी (ता. २९) झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम आदी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका उपस्थित होत्या. 

सर्वाधिक रुग्ण रावळगाव केंद्रांतर्गत 

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी भायगाव येथे शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात १२० बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. निमगाव येथेही ५० बेडची अतिरिक्त सुविधा उपलब्ध आहे. सामान्य रुग्णालयात १०० बेडचे आरक्षण ग्रामीण भागातील रुग्णांसाठी करण्यात आले आहे. ग्रामसमित्यांसह दक्षता समित्यांनी प्रभागनिहाय कोरोनाच्या रुग्णांवर देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात ७१ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र करंजगव्हाण येथे ११०, वडनेर येथे ८५, रावळगाव येथे १४४, तर सौंदाणे येथे ६६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात ६०८ सक्रिय रुग्ण आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com