कोरोना वर्षपूर्तीचा आढावा : भय... मात... नवे आव्हान..! 

lockdown 2.jpg
lockdown 2.jpg

नाशिक : गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने देशात प्रवेश केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरे, गावांमध्ये प्रवेश केला. नाशिक ग्रामीणमध्ये २९ मार्चला, तर शहरात ६ एप्रिलला कोरोनाचा पहिला रग्ण गोविंदनगर भागात आढळला. त्यानंतर शहरात कोरोनाचा हाहाकार ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिला. त्यानंतरचे तीन महिने म्हणजे जानेवारीपर्यंत शहरात शंभर ते दीडशे रुग्ण सापडत असल्याने कोरोना गायब झाल्यासारखे चित्र निर्माण झाले. याला नागरिकांचा हलगर्जीपणा व प्रशासनाचा गाफीलपणा कारणीभूत ठरला. फेब्रुवारीत कोरोना संसर्ग सेकंड इनिंगमध्ये सहा ते आठपटींनी अधिक असल्याने भयावह चित्र निर्माण झाले आहे. वर्षभरात कोरोनाचे भय, कोरोना संसर्गाला आळा घालताना केलेली मात व आता नव्या कोरोना स्टेन्सच्या निमित्ताने निर्माण झालेले आव्हाने याचा घेतलेला आढावा. 

शहरातील हॉटस्पॉट 
एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना प्रथम गोविंदनगर भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. त्यानंतर बजरंगवाडी, वडाळागाव, जुने नाशिक, सातपूरमधील संजीवनगर, सिडकोतील लेखानगर, तसेच पंचवटी विभागातील फुलेनगर हॉटस्पॉट ठरले. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

ऑक्सिजन पुरवठा खंडित 
सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या उच्चांकी गाठत असताना ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला. पनवेल येथून ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आल्यानंतर महापालिकेने बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. 

प्रादेशिक मतभेद 
नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी प्रमाणात आढळत असताना मालेगाव शहर देशात हॉटस्पॉटमध्ये आले. त्या मुळे नाशिकमध्ये मालेगाव, तसेच अन्य भागातून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला. महापौरांसह आमदारांनी नाकाबंदीची मागणी केल्याने प्रादेशिक वादाला तोंड फुटले होते. 


हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 
 
वर्षभरातील कोरोना स्थिती 
- एकूण रुग्ण - एक लाख २४ हजार ३१६ 
- बरे झालेले रुग्ण- एक लाख पाच हजार ७० (८४.५१ टक्के) 
- मृत्यू - एक हजार १७७ (०.९४ टक्के) 
- उपचार घेत असलेले- १८ हजार ६९ (१४.५३ टक्के) 
- घरी उपचार घेत असलेले- १५ हजार ४६ 
- रुग्णालयात उपचार घेणारे- तीन हजार २३ 
- एकूण तपासणी- चार लाख ३६ हजार ५३७ (आरटीपीसीआर - दोन लाख ९१ हजार ५६६ व रॅपिड ॲन्टिजेन- एक लाख ४४ हजार ९७१) 
- ४ एप्रिल २०२१ ला पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या (२८.५१ टक्के) 
- २९ मार्च २०२१ ते ४ एप्रिल २०२१ दरम्यान सर्वाधिक ४५ हजार ४५९ चाचण्या (३४ टक्के पॉझिटिव्ह) 
- एकूण ५४ सेंटरवर कोव्हिशील्ड- एक लाख १८ हजार ७९९, तर कोव्हॅक्सिन- २४ हजार ६१२ डोस. 
- मास्क न घातलेल्या १४ हजार ६५२ जणांवर दंडात्मक कारवाई. ४९ लाख ७८ हजार ७५० रुपये दंड वसूल. 
 
ज्येष्ठांना घेरले मृत्यूने 
६ एप्रिल २०२० ते ४ एप्रिल २०२१ या वर्षभराच्या कालावधीत एक हजार १७० जणांना मृत्यूने घेरले. सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे झाले. दहा वर्षांपर्यंतचे मृत्यू- एक, अकरा ते वीस वयोगटांतील- दोन, २१ ते ३० वयोगटांतील- १९, ३१ ते ४० वयोगटांतील- ७१, ४१ ते ५० वयोगटांतील- १३२, ५१ ते ६० वयोगटांतील- २८०, ६१ ते ७० वयोगटांतील- ३६४, ७१ ते ८० वयोगटांतील- २२८, ८१ ते ९० वयोगटांतील- ७१, तर ९१ ते १०० वयोगटांतील नऊ कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. महापालिका व खासगी रुग्णालयांत- 
६६६, जिल्हा रुग्णालयात- ३१५, मविप्र रुग्णालयात- १९६ मृत्यू झाले. सर्वाधिक मृत्यू पंचवटी विभागात- २६३, पूर्व विभागात- २३२, नाशिक रोड विभागात- २३०, सिडको- २२१, पश्‍चिम- १३५, तर सातपूर विभागात- ९६ मृत्यू झाले. 

गंभीर रुग्णांना धोका 
एकूण मृत्यूपैकी ३७४ मृत्यू गंभीर आजार असलेल्या नागरिकांचे झाले आहेत. यात मधुमेही- १३४, रक्तदाब- ६३, हृदयरोग- २९, किडनी- दोन, श्‍वसनाचे आजार- १२२, इतर आजारांच्या ३० रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com