मनपाची पोटनिवडणूक लांबणीवर; नव्याने मतदारयादी जाहीर करणार 

nmc 123.jpg
nmc 123.jpg

नाशिक : पंचवटी विभागातील प्रभाग ४ (अ) च्या पोटनिवडणुकीसाठी राबविलेला मतदारयाद्यांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने रद्द करताना नव्याने मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने पोटनिवडणूक लांबणीवर पडली आहे. 

मनपाची पोटनिवडणूक लांबणीवर 
पंचवटीच्या फुलेनगर भागातील प्रभाग ४ (अ) च्या नगरसेविका शांताबाई हिरे यांचे अकस्मात निधन झाल्याने त्या रिक्तपदावर पोटनिवडणूक घेतली जाईल. त्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. १ जानेवारी २०१९ च्या विधानसभा मतदारयादीवरून प्रारूप मतदारयाद्या तयार करून ९ मार्च २०२०ला प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर १६ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागवून २३ मार्चला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. परंतु लॉकडाउनमुळे १७ मार्च २०२० ला मतदारयादीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला.

नव्याने मतदारयादी जाहीर करणार 

पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२० या आर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदारयादी २५ सप्टेंबरला प्रसिद्ध केली आहे. सर्व नवीन मतदारांचा यादीत समावेश होणे अपेक्षित असल्याने यापूर्वीचा मतदारयादीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. पोटनिवडणुकीसाठी आता नव्याने मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. 

नव्या मतदारांना हक्क बजावण्याची संधी 
पोटनिवडणुकीसाठी आता नव्याने मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. नव्या मतदारयाद्या नवीन मतदार नोंदणी केलेल्या मतदारांच्या नावांसह अद्ययावत असतील. त्यामुळे नवीत मतदारांना पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com