एक होती तान्हुल्याच्या काळजीपोटी गड उतरणारी हिरकणी..अन् एक 'ही'..! घराघरात चर्चा..

प्रमोद दंडगव्हाळ
Wednesday, 29 July 2020

ज्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी शत्रूंचाही थरकाप उडायचा त्याच गडाची पश्चिम कडा आपल्या तान्हुल्याच्या काळजीपोटी एक आई जीवाची पर्वा न करता उतरली होती. एका आईची ही यशोगाथा लहानपणापसून ऐकतोय. दिवसभर भुकेने व्याकूळ असलेल्या बाळाला भेटण्यासाठी रात्री किल्ला उतरणाऱ्या ‘हिरकणी’ची गोष्ट सर्वांना चांगलीच माहिती आहे. पण अशाच आणखी एका हिरकणीची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. ​

नाशिक / सिडको : ज्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी शत्रूंचाही थरकाप उडायचा त्याच गडाची पश्चिम कडा आपल्या तान्हुल्याच्या काळजीपोटी एक आई जीवाची पर्वा न करता उतरली होती. एका आईची ही यशोगाथा लहानपणापसून ऐकतोय. दिवसभर भुकेने व्याकूळ असलेल्या बाळाला भेटण्यासाठी रात्री किल्ला उतरणाऱ्या ‘हिरकणी’ची गोष्ट सर्वांना चांगलीच माहिती आहे. पण अशाच आणखी एका हिरकणीची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. 

सिडकोतील अशाच एका हिरकणीची चर्चा सध्या घराघरांत

प्रभाग २७ च्या शिवसेना नगरसेविका किरण गामणे- दराडे यांनी सेंट लॉरेन्स स्कूलच्या मागील गार्डन परिसरातील एका छोट्या सभागृहात प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट सेंटर सुरू केले आहे. सहा दिवसांपासून किरण गामणे केंद्रात उपस्थित राहून नागरिकांची तपासणी करीत आहेत. घरी त्यांची दोन वर्षांची मुलगी असून, त्या या ठिकाणी न चुकता येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या जागेवरच औषध देऊन पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करीत आहेत. प्रभागातील नागरिक माझे माय-बाप आहेत, असे समजून मी हे कार्य करीत आहे, असे नगरसेविका दराडे सांगतात. त्यांच्या या त्यागाला नागरिकांनी कोरोनायोद्धा म्हणून सलाम ठोकला आहे. दोन वर्षांच्या मुलीला घरी ठेवून कोरोना चाचणीसाठी दिवसभर थांबणाऱ्या सिडकोतील अशाच एका हिरकणीची चर्चा सध्या घराघरांत ऐकायला मिळत आहे.

हेही वाचा > संपूर्ण गाव हादरले! विहीरीत तरंगणारी 'ती' गोष्ट पाहिली..खुलासा होताच कुटुंबियांचा आक्रोश

रुग्णांकडून कौतुक

सहा दिवसांपासून आम्ही रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करीत आहोत. यात रुग्णांची नोंद ठेवणे, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना औषधी देणे, तसेच महापालिका डॉक्टरांना यासंदर्भात कळवून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन नगरसेविका किरण गामणे- दराडे करीत आहेत. दोन वर्षांच्या मुलीला घरी ठेवून व त्यांचे परिश्रम पाहून आलेले रुग्णही त्यांचे कौतुक करीत आहेत.- प्रवेश झा, लॅब टेक्निशियन, गौरी पॅथॉलॉजी लॅब 

रिपोर्ट - प्रमोद दंडगव्हाळ

संपादन - ज्योती देवरे

हेही वाचा > अखेर गुढ उकलले! घनदाट घाटात आढळलेल्या संशयास्पद प्रकाराचा पोलीसांनी लावला छडा.. असा रचला प्लॅन​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator Darade corona fighter nashik marathi news