जेव्हा सभागृहात सौ. नी श्रीं ची केली बोलती बंद! नगरसेविकेच्या वाक्याने सभागृहात एकच हास्यकल्लोळ 

badgujar couple.jpg
badgujar couple.jpg

सिडको (नाशिक) : वैवाहिक जीवनात घरातील सत्ता कितीही नाकारली तरी महिलांच्या हातातच असते. किंबहुना त्यांना विनोदाने गृहमंत्रीच म्हटले जाते. घरातील निर्णयप्रक्रियेत त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. शिवाय समाजात पुरुषाचे कितीही महत्त्वाचे स्थान असले तरी घरात महिलांची हुकूमत असते. असाच प्रसंग प्रभाग २५ चे नगरसेवक दांपत्य सुधाकर बडगुजर आणि हर्षा बडगुजर यांच्याबाबत गुरुवारी (ता. २९) प्रभाग समिती सभेत पाहायला मिळाला आणि एकच हास्यकल्लोळ उडाला. 

भाऊ, तुम्ही थोडं थांबा, मला महत्त्वाचं बोलायचं आहे 
त्याचे झाले असे, की लॉकडाउननंतर प्रथमच सिडको प्रभागाची सभा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन झाली. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्या मांडू लागले. त्यातच नेहमीप्रमाणे शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आपले म्हणणे मांडण्यासाठी सभागृहात उभे राहिले. नेमके त्याच वेळी त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका हर्षा बडगुजर आपले म्हणणे मांडण्यासाठी सभागृहात उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या ‘भाऊ, तुम्ही थोडं थांबा, मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे’ असे सांगत  बडगुजर यांचे बोलणे सुरू होण्यापूर्वीच थांबविले व आपले म्हणणे मांडले. त्यामुळे गृहमंत्र्यांचा दबदबा केवळ घरातच नव्हे, तर बाहेरही असतो, हे या प्रसंगावरून दिसून आले आणि एकच हशा पिकला. यामुळे सभागृहात खेळीमेळीचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com