भाजपच्या नगरसेविकेतर्फे सुरू तपासणी शिबिरामार्फत पतीच पॉझिटिव्ह आढळतात तेव्हा

प्रमोद दंडगव्हाळ
Monday, 27 July 2020

 कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नगरसेविका ढोमसे यांच्यातर्फे सुरू असलेल्या तपासणी शिबिराच्या सकारात्मक भूमिकेचे प्रभागातील नागरिकांनीही स्वागत केले आहे. चार ते पाच दिवसांपासून भाजप नगरसेविका व त्यांचे पती राकेश ढोमसे प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन ताप, ऑक्सिजन लेव्हल व ॲन्टिजेन रॅपिड टेस्ट करून घेत आहेत. पण त्यावेळी खुद्द नगरसेविकेचे पतीच पॉझिटिव्ह आढळल्याने नगरसेविकेची अशी प्रतिक्रिया होती.​

नाशिक / सिडको : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नगरसेविका ढोमसे यांच्यातर्फे सुरू असलेल्या तपासणी शिबिराच्या सकारात्मक भूमिकेचे प्रभागातील नागरिकांनीही स्वागत केले आहे. चार ते पाच दिवसांपासून भाजप नगरसेविका व त्यांचे पती राकेश ढोमसे प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन ताप, ऑक्सिजन लेव्हल व ॲन्टिजेन रॅपिड टेस्ट करून घेत आहेत. पण त्यावेळी खुद्द नगरसेविकेचे पतीच पॉझिटिव्ह आढळल्याने नगरसेविकेची अशी प्रतिक्रिया होती.

ॲन्टिजेन रॅपिड टेस्टमध्ये नगरसेविकेचे पतीच आढळले पॉझिटिव्ह

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नगरसेविका ढोमसे यांच्यातर्फे सुरू असलेल्या तपासणी शिबिराच्या सकारात्मक भूमिकेचे प्रभागातील नागरिकांनीही स्वागत केले आहे. चार ते पाच दिवसांपासून भाजप नगरसेविका भाग्यश्री ढोमसे व त्यांचे पती राकेश ढोमसे प्रभाग २५ मधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन ताप, ऑक्सिजन लेव्हल व ॲन्टिजेन रॅपिड टेस्ट करून घेत आहेत. त्यास नागरिक व रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच तपासणी शिबिरात अर्ध शतकापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या तपासणी शिबिरात राकेश ढोमसेही पॉझिटिव्ह आढळले, ही बाब विशेष ठरली. येथील प्रभाग २५ च्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांचे पती राकेश ढोमसे ॲन्टिजेन रॅपिड टेस्टच्या माध्यमातून घेतलेल्या तपासणीत पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे नागरिकांसाठी सुरू असलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे फलित झाले असून, याच भावनेतून नागरिकांच्या तपासण्या सुरू ठेवण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी दिली.

हेही वाचा > पुतणीला सतत टोमणे मारणे भोवले काकाला... केले  आत्महत्येस प्रवृत्त

शिबिर नागरिकांसाठी सातत्याने सुरू

मागील चार ते पाच दिवसांपासून सातत्याने आम्ही प्रभागात ॲन्टिजेन रॅपिड टेस्ट करीत आहोत. या तपासणीदरम्यान माझे पती राकेश ढोमसे हेही पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे असले तरी हे शिबिर नागरिकांसाठी सातत्याने सुरू ठेवणार आहोत.- भाग्यश्री ढोमसे, नगरसेविका, प्रभाग २५

हेही वाचा >  संतापजनक! मुलाला भेटायला गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण 

ॲन्टिजेन रॅपिड टेस्टमुळे मी स्वतः तपासणी करून घेतली. त्यात मी पॉझिटिव्ह आढळून आलो. त्यामुळे उपचार करणे सोपे गेले. खऱ्या अर्थाने शिबिराचा मलाही फायदा झाला. हे शिबिर सुरूच ठेवणार आहोत.-राकेश ढोमसे, भाजप पदाधिकारी व नगरसेविका पती 

 

(संपादन - ज्योती देवरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporator husband was found positive in the antigen rapid test nashik marathi news