"हीच आमची खरी लक्ष्मी! सरकारला शेतकरीवर्गासाठी पूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे" दांपत्याकडून कांद्याचेच लक्ष्मीपूजन

onion nifad.jpg
onion nifad.jpg

निफाड (जि.नाशिक) : सरकारला शेतकरीवर्गासाठी पूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, अशी या वेळी दाम्पत्यांनी मागणी केली.

कष्टानं पिकवलेला कांदाच आपली लक्ष्मी.

सध्या देशात कांदा चर्चेचा विषय; पण मोठ्या कष्टानं पिकवलेला कांदाच आपली लक्ष्मी. यावरच आपला कुटुंबकबिला अवलंबून असल्याने भावाचं काही असो स्वतः पिकवलेल्या कांद्याचेच लक्ष्मीपूजनाला नैताळेचे शेतकरी संजय साठे आणि त्यांच्या पत्नी शोभा साठे या दांपत्याने शनिवारी (ता. १४) पूजन करत केंद्र सरकारच्या धोरणावर असमाधान व्यक्त केले. 

सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण
गेल्या काही वर्षात सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण ठरत आहे. आधीच तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसत आला आहे. त्यातच केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडतं आहे. असेच गत वर्षीही संजय साठे यांनी आपल्या मातीमोल विकलेल्या कांद्याची पंतप्रधानांना मनिआर्डर केली होती. आज पुन्हा शेतकरीवर्गाच्या व्यथा सरकारदरबारी पोचाव्यात म्हणून आपल्या कांदाचाळीला सजवून साठे दांपत्याने कांद्यांची विधिवत पूजा करत या सरकारला शेतकरीवर्गासाठी पूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, अशी या वेळी मागणी केली.

मातीमोल विकण्याची वेळ

दरम्यान, शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेत कांद्याचे पीक घेतले. मात्र त्या पिकाला निसर्गाचा फटका बसला. जे पीक हातात आले ते शासनाच्या निर्णायामुळे मातीमोल विकण्याची वेळ आली आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करावा, यासाठी सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी आम्ही कांद्यांचे पूजन केल्याचे संजय साठे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com