आश्‍चर्यच! दुधापेक्षा अधिक गोमूत्राला आलाय भाव; अचानक मागणी वाढण्याचे कारण तरी काय?

gomutra.jpg
gomutra.jpg

आश्‍चर्यच! दुधापेक्षा गोमूत्राला अधिक भाव
वाचा कशामुळे वाढला वापर

 
नाशिक / देवळा : काय सांगता ! दुधापेक्षा अधिक भाव आता गोमुत्राला आलाय. पण अचानक इतकी मागणी वाढण्याचे नेमके कारण तरी काय? कशासाठी लोकं आता गोमुत्राचा अधिकाधिक वापर करु लागलेत? वाचा सविस्तर

दुधापेक्षा अधिक भाव आता गोमुत्राला

दुधापेक्षा अधिक भाव आता गोमुत्राला आलाय. पण अचानक इतकी मागणी वाढण्याचे नेमके कारण तरी काय? कशासाठी लोकं आता गोमुत्राचा अधिकाधिक वापर करु लागलेत? गोमूत्र हे औषधी असून, आयुर्वेदिक उपचारासाठी त्याचा वापर केला जातो. गोमूत्र अर्काचा वापर प्रभावी सिद्ध झाला आहे. यात देशी म्हणजे गावठी गायीच्या गोमूत्राला जास्त मागणी असते. परंतु दोन-तीन गायींचे पालन करणारे शेतकरी गोमूत्र जमा करण्यास कंटाळा करतात. परंतु याचे योग्य नियोजन केल्यास गोमूत्राचे संकलन करता येणे सहज शक्य आहे. 

शुद्ध गोमूत्र ४० ते ६० प्रतिलिटर

गोमूत्राचे विविध औषधांसह इतरही अनेक उपयोग असल्याने गोमूत्राला मागणी वाढली आहे. जैविक शेतीसाठी गोमूत्राचा उपयोग अधिक प्रभावी सिद्ध होत असल्याने आता फळबाग व भाजीपाला उत्पादक शेतकरी गोमूत्राचा वापर करू लागले आहेत. शुद्ध गोमूत्र ४० ते ६० प्रतिलिटर विकले जाते. यामुळे दुधापेक्षा गोमूत्र महाग झाल्याचे चित्र आहे. 

औषध म्हणून उपयुक्त 
खालपचे युवा शेतकरी खुशाल सूर्यवंशी यांनी शेती करताना आता गोमूत्राचा वापर वाढू लागला आहे. परंतु आपल्याकडे आता गोधन कमी झाल्याने गोमूत्र मिळण्यास अडचणी येतात. त्यासाठी गोमूत्र विक्री केंद्र सुरू होण्याची गरज आहे. गोशाळावाल्यांनी गोमूत्र जमा करून विक्रीची जाहिरात केल्यास घेणाऱ्यांची सोय होईल आणि गोपालकांनाही त्याचा फायदा मिळेल असे मत मांडले. तर गोमूत्र हे काही आजारांवर औषध म्हणून तसेच सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे. ऋषी कृषीमध्ये याचा उल्लेख असल्याचे कृषितज्ज्ञ आयुर्वेद जाणकार पुंडलिक आहेर यांनी म्हंटले आहे.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

फळ व भाजीपाला पिकांवर कीटकनाशक औषधांची फवारणी प्रमाणापेक्षा जास्त केली जात असल्याने कर्करोगासारखे आजार उद्भवू लागले आहेत. म्हणून या भागातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी गोमूत्राची फवारणी करत तसेच गोमूत्राची स्लरी बनवत ती अशा पिकांना दिली जात आहे. यामुळे कीड नियंत्रण होत असून, पिकांचे संरक्षण होण्यास मदत मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचा असा चांगला परिणाम पिकांवर दिसत असल्याने याचे अनुकरण इतरही शेतकरी करू लागले आहेत. काहींनी गायीचे शेण व गोमूत्र एकत्र करत व त्यात गूळ, डाळीचे पीठ, अंडी एकत्र करत शेणस्लरी बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे. यातून जिवाणूनिर्मिती करून ते मिश्रण पिकांना दिले जाते. 

जैविक शेतीसाठी वापर 
शेणस्लरी तयार करण्यासाठी गोमूत्र लागते. स्वतःच्या गायी-म्हशी असल्याने त्यातून मी स्लरी तयार करून विकतो. याचा शेतीला चांगला फायदा होत असल्याने जैविक शेतीचा आग्रह धरणारे शेतकरी याचाच वापर करतात असे कळवण येथील किरण पगार या शेणस्लरी बनविणाऱ्या व्यावासायिकाने सांगितले. तसेच वाजगाव, ता. देवळा येथील शेतकरी बाळासाहेब देवरे यांनी जवळपास ६० ते ६५ भाकड गायींचे आम्ही संगोपन करतो. या गायींच्या मलमूत्राचाच आम्ही खत म्हणून वापर करतो. रासायनिक खतांचा शक्यतो आम्ही वापर करत नाहीत. गोमूत्राचे संकलन करून त्याचा वापर फळशेतीसाठी करत असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com