शेवटी ती पण एकच महिलाच! पोलिस काँन्स्टेबल धावली अडलेल्या गायीच्या मदतीला

cow with calf.jpg
cow with calf.jpg

देवळाली कॅम्प (नाशिक) : शेवटी एक महिलाच एका महिलेचे दु:ख समजू शकते. याचे  जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यासममोरील वडनेर रोडलगत एक गाय प्रसूतीसाठी रेंगाळत असल्याचे महिला पोलीस हवालदाराच्या निदर्शनास आले. त्यानंतर आशा खैरनार यांच्या कामगिरीने  परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. 

प्रसूतीसाठी अडलेल्या गायीसाठी धावली महिला पोलीस हवालदार

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यासममोरील वडनेर रोडलगत एक गाय प्रसूतीसाठी रेंगाळत असल्याचे खैरनार यांच्या निदर्शनास आले. माहेरी कोठुरे (ता. निफाड) येथे जनावरांससोबत बालपण घालविणाऱ्या खैरनार यांनी सासरी देवळा येथेही जनावरांना सोबतची नाळ कायम ठेवली. मुक्या प्राण्यांची कायम सेवा केली. पोलिस खात्यात नोकरी करताना कोठेही असे भटके प्राणी आढळतात. त्यांना चारापाणी देण्यासाठी पुढाकार घेतात. त्या सध्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. प्रसूतीस अडलेल्या गायीला स्वतः डॉक्टर होत वासरासह सुरक्षित करण्याचे काम येथील महिला पोलिस हवालदार आशा खैरनार यांनी पार पडल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. 

परिसरात त्यांचे कौतुक

सकाळी पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर एक गाय प्रसूतीसाठी वेदनेने विव्हळत होती. त्यांनी तातडीने दोघा होमगार्ड यांना सोबत घेऊन या गायीसाठी हरभराडाळ, गुळाची व्यवस्था केली. गायीला वासरू झाले. मात्र, जार पडला नाही. यातच भटके कुत्री त्रास देत होती. त्या सर्वांना पिटाळून लावत जारदेखील व्यवस्थित पडल्यानंतर व्यवस्था लावली. त्या गाई, वासरास गरम पाण्याने धुवून स्वच्छ केले. तिच्यासाठी खुराकाची व्यवस्था केली. दोन तासांच्या शस्त्रक्रियेदरम्यान जबरी ग्रुपचे संतोष गायकवाड, रवी गांगुर्डे, राजू वाघमारे, प्रशांत बागूल यांनी घटनास्थळी जाऊन आशा खैरनार यांचे अभिनंदन केले. 
 

लहानपणापासून मुक्या प्राण्यांबद्दल आपल्याला विशेष प्रेम आहे. गायीची प्रसूती व पडणारा जार याची कल्पना असल्याने सर्व व्यवस्थित करताना कुत्र्यापासून स्वरक्षण केले. तिला पोषक आहार दिला. याकामी होमगार्ड बंधूंचे सहकार्य लाभले. मुक्या प्राण्यांना दया दाखविणे गरजेचे आहे. - आशा खैरनार, महिला पोलिस कर्मचारी  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com