धक्कादायक! दारुसाठी 'ते' पोहचले खालच्या थराला..केला 'असा' प्रकार

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 28 May 2020

मद्यविक्रीसाठी जेव्हा शासनाने परवानगी दिली तेव्हा कोरोना व्हायरस होण्याचा, जिवाचा धोका पत्करून हजारो तळीराम उन्हातान्हात तासन् तास रांगेत उभे राहिले होते. काहींना पोलिसांच्या लाठ्याही खाव्या लागल्या.तिकडे सोशल मीडियावर अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. पण आता याच दारूसाठी काही लोकं आता इतक्या खालच्या थराला जाऊ लागलेत. असाच काहीसा संतापजनक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

नाशिक : मद्यविक्रीसाठी जेव्हा शासनाने परवानगी दिली तेव्हा कोरोना व्हायरस होण्याचा, जिवाचा धोका पत्करून हजारो तळीराम उन्हातान्हात तासन् तास रांगेत उभे राहिले होते. काहींना पोलिसांच्या लाठ्याही खाव्या लागल्या.तिकडे सोशल मीडियावर अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. पण आता याच दारूसाठी काही लोकं आता इतक्या खालच्या थराला जाऊ लागलेत. असाच काहीसा संतापजनक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

असा घडला प्रकार

अंबडच्या चुंचाळे शिवारामध्ये दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणातून अज्ञात तिघांनी एकावर चाकूने हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली. बाळू खंडू जाधव (रा. दत्तनगर, चुंचाळे शिवार, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या बुधवारी (ता. 27) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास क्‍लस्टर कंपनीच्या मागे बसलेले होते. त्यावेळी अज्ञात तिघे संशयित आले आणि त्यांनी जाधव यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, त्यांनी नकार दिला. त्याचा राग धरून एका संशयिताने त्याच्याकडील रामपुरी चाकूने पोटाजवळ, छातीवर वार करून जखमी केले. तर दोघा संशयितांनी मारहाण करीत बळजबरीने जाधव यांच्या खिशातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे हे तपास करीत आहेत.

हेही वाचा > ''तिच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला परवानगी नाकरली.. म्हणूनच मी तिच्यासोबत.. ''..माथेफिरू युवकाची धक्कादायक जबानी

वाढतयं दारूचे व्यसन

जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर म्हटलंय की, भारतात दारू पिण्याचं प्रमाण वेगाने वाढतंय. भारतातला सरासरी पुरुष दरवर्षी 18.3 लीटर शुद्ध अल्कोहोल रिचवतो, तर भारतातली महिला सरासरी 6.6 लीटर दारू पिते. तुम्हाला माहिती असेल की, बाजारात उपलब्ध असलेल्या बिअर, वाईन, व्हिस्की वगैरे प्रकारांमध्ये 4-5 टक्क्यांपासून 40-50 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असतं. या आकडेवारीत त्यातलं फक्त अल्कोहोल पकडण्यात आलंय.

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime happened when not paying for alcohol nashik marathi news