PHOTOS : आणखी एका प्रसिद्ध "ज्वेलर्स" कडून फसवणुकीची शक्‍यता..गुंतवणूकदारांची गर्दी.

सोमनाथ कोकरे : सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 15 February 2020

दरमहा आर्थिक गुंतवणुकीवर सोने देण्याची योजनेत गुंतवणूकदारांनी आर्थिक गुंतवणूक केली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून संबंधित ज्वेलर्सकडून गुंतवणूकदारांना परतावा न मिळाल्याने शनिवारी (ता.15) कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर ज्वेलर्स येथे मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांनी गर्दी केली.

नाशिक : मिरजकर सराफ पेढीकडून गुंतवणूकदारांची झालेली फसवणुकीची घटना ताजी असतानाच, शहरातील आणखी एक प्रसिद्ध आडगावकर ज्वेलर्सकडूनही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्‍यता व्यक्त होते आहे.

Image may contain: 1 person, smiling, crowd and outdoor

पोलिसांची मध्यस्थी; कॅनडा कॉर्नरवर वाहतूक कोंडी 

दरमहा आर्थिक गुंतवणुकीवर सोने देण्याची योजनेत गुंतवणूकदारांनी आर्थिक गुंतवणूक केली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून आडगावकर ज्वेलर्सकडून गुंतवणूकदारांना परतावा न मिळाल्याने शनिवारी (ता.15) कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर ज्वेलर्स येथे मोठ्यासंख्येने गुंतवणूकदारांनी गर्दी केली. वेळीच पोलिस उपायुक्तांनी मध्यस्थी करीत, गुंतवणूकदारांना पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन केले असले तरी सायंकाळपर्यंत सरकारवाडा पोलिसात एकही गुंतवणूकदार तक्रारीसाठी फिरकला नव्हता. 

Image may contain: 7 people, crowd and outdoor

सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही
सराफी व्यवसायिकांकडून 11 महिन्यांसाठी आर्थिक गुंतवणुकीची योजना राबविली जाते. 11 महिन्यांनंतर सराफांकडून बाराव्या महिन्याची रक्कम टाकून त्या रकमेचे सोने दिले जाते, अशी योजना असते. आडगावकर ज्वेलर्सकडील अशाच काही योजनांमध्ये शहरातील शेकडो गुंतवणूकदारांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे. मात्र, मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमेचा दागिना मिळाला नाही किंवा पैसेही परत मिळाले नाही. त्यामुळे या गुंतवणूकदारांनी वारंवार आडगावकर ज्वेलर्समध्ये येऊन त्याबाबत मागणी करुनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गुंतवणूकदार आडगावकर ज्वेलर्समध्ये चकरा मारत होते. 

फसवणूक होत असल्याची गुंतवणूकदारांची भावना

मात्र, शनिवारी (ता.15) शहरातील विविध भागातील ज्वेलर्सच्या पेढींवर गुंतवणूकदारांनी गर्दी केली. त्या सर्वांना कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर ज्वेलर्स याठिकाणी जाण्यास सांगितले होते. काही गुंतवणूकदारांनी ज्वेलर्सच्या संचालकांनी लेखी हमी दिल्याचेही आढळून आले. दरम्यान शनिवारी सकाळपासूनच आडगावकर ज्वेलर्समध्ये गुंतवणूकदारांची गर्दी झाली. मात्र त्यांना आजही पैसे किंवा दागिने मिळाले नाही. त्यामुळे फसवणूक होत असल्याची गुंतवणूकदारांची भावना झाल्याने संताप व्यक्त केला जात होता. गर्दी वाढत जाऊन त्याचा ताण कॅनडा कॉर्नरवर गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवली.

Image may contain: 39 people, including Khushal Patil, crowd

 हेही वाचा > PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

घटनेची माहिती मिळताच, परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी कॅनडा कॉर्नर येथे धाव घेतली आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधत, त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी सरकारवाडा पोलिसात जाण्याचे आवाहन केले. मात्र, सायंकाळपर्यंत एकही गुंतवणूकदार तक्रारीसाठी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिरकला नाही. मात्र गुंतवणूकदारांच्या गर्दीमुळे कॅनडा कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती. 

 हेही वाचा > गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowd of investors at Adgaonkar Jewelers may fraud in the schemes Nashik Marathi News