नावनोंदणीला पहिल्याच दिवशी 'सर्व्हर डाऊन'चा अडथळा; येवल्यात मका खरेदी केंद्रावर पहाटेपासून गर्दी

Crowd at maize guarantee price registration center
Crowd at maize guarantee price registration center

नाशिक/येवला : सध्या खाजगी बाजारात मकाला १२०० ते १५०० रुपयांचा दर मिळत असून शासनाच्या हमीभावापेक्षा किमान ४०० ते ६०० रुपयांची तफावत असल्याने शेतकरी हमीभावाने मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. याचळे येथील शासकीय खरेदी केंद्र असलेल्या तालुका खरेदी विक्री संघात सोमवारी (ता.२) मका विक्रीस नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली. मात्र पहिल्याच दिवशी नोंदणीसाठी सर्व्हर डाऊनचा अडथळा शेतकऱ्यांना सहन करावा लागला. 

पहाटे ४ पासूनच शेतकऱ्यांची गर्दी

जिल्ह्यातील ८ केंद्रावर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून १८५० रुपये दराने मका खरेदी होणार आहे. यासाठी प्रथम ऑनलाइन नावनोंदणी करावी लागते. फेडरेशनने आजपासून नाव नोंदणी जाहीर केल्याने पहाटे ४ पासूनच नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. अशातच मका खरेदीच्या नोंदणीसाठी शासकीय पोर्टल डाऊन झाल्याने सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत शेतकऱ्यांची नोंदणीच होऊ न शकल्याने येथील वातावरण तप्त होऊन काही शेतकऱ्यांनी मोठा गोंधळ घातला. रांगा लावणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कोणाचा नंबर पहिला यावरून आपसात वादावादी झाली. शेतकरी नाव नोंदणीच्या मागणीवर ठाम होते. वाढता गोंधळ बघता जेष्ठ नेते माणिकराव शिंदे, संघाचे अध्यक्ष अनिल सोनवणे आणि संघाच्या सदस्यांनी संघाच्या कार्यालयाकडे धाव घेत संतप्त शेतकऱ्यांची समजूत घातल्याने वातावरण शांत झाले. आलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून कोणावरही अन्याय होणार नाही असा शब्द शिंदे यांनी दिल्याने उपस्थित शेतकरी शांत झाले. दुपारनंतर नोंदणीसाठीचे शासकीय पोर्टल सुरळीत झाल्याने अनेक तास रखडलेली नोंदणी सुरु झाली. 

पहिल्या दिवशी ४१० शेतकऱ्यांनी संघाच्या बाहेर नोंदणीसाठी हजेरी लावली होती. शेतकऱ्यांच्या दररोज १०० याप्रमाणे ४ याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नोंदणी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. 
- माणिकराव शिंदे, जेष्ठ नेते, येवला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com