ब्रेकिंग : नामपूरला सिलेंडरचा भीषण स्फोट; तीन जण गंभीर जखमी; ३ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश

प्रशांत बैरागी
Saturday, 29 August 2020

स्फोटाची तीव्रता इतकी होती की, गणेश पवार यांच्या घराची भिंत अंगणात पडली असून स्लैबला तडे गेले आहेत.

नाशिक / नामपूर : नामपूर येथील शिवम नगर परिसरात वाहनचालक असलेल्या गणेश पवार यांच्या घरात गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले असून मालेगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्फोटात लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान 

 शनिवारी ( ता. २९) सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, गणेश पवार यांच्या घराची भिंत अंगणात पडली असून स्लैबला तडे गेले आहेत. घटनेनंतर  परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमी झालेल्या गणेश पवार, त्यांची पत्नी कोमल पवार ( वय ३५ ) व मुलगा राज पवार ( वय ३ वर्ष ) यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. बागलाणचे प्रभारी तहसीलदार बहिरम, सागर रोकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तलाठी राजू काष्टे, पोलीस कर्मचारी यांनी घटनेचा पंचनामा केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा

हेही वाचा > वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cylinder explosion at nampur nashik marathi news

टॉपिकस
Topic Tags: