esakal | गालोशी येथे व्हायरसच्या प्रादूर्भावाने टोमॅटोचे शेत धोक्यात; शेतकरी चिंतेत
sakal

बोलून बातमी शोधा

tomatoes farm.jpg

यंदा परतीच्या पावसाचा कहर सर्वत्र होता. त्यात टोमॅटो रोपांवर सुकवा येण्याचे प्रमाण वाढल्याने गालोशी पाड्यावरील शेतकऱ्याचे उभे पीक सुकव्यात नष्ट झाले आहे. मोठया आशेने मेहनतीने पिकविलेल्या टोमॅटो लागवडीवर वाढता व्हायरसचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गालोशी येथे व्हायरसच्या प्रादूर्भावाने टोमॅटोचे शेत धोक्यात; शेतकरी चिंतेत

sakal_logo
By
राम खुर्दळ

नाशिक/गिरणारे : नाशिकच्या पश्चिमपट्ट्यातील गालोशी गावाच्या गंगाराम बेंडकोळी या तरुण शेतकऱ्यांचे टोमॅटोचे उभं पीक व्हायरसच्या प्रादूर्भावाने सुकून गेलं. यामुळे मोठ्या मेहनतीने लागवडीसाठी उभा केलेला पैसा कसा फेडायचा? या विवंचनेत असल्याचे संबंधित शेतकऱ्याने 'दैनिक सकाळ'च्या प्रतिनिधींशी बोलतांना आपली व्यथा मांडली.

शेतकऱ्याचे उभे पीक सुकव्यात नष्ट

नाशिकचा पश्चिम पट्टा ही टोमॅटोची कृषी पंढरी म्हणून ओळखला जातो. या भागातील उत्तम प्रतीचे टोमॅटो देशा - परदेशात जातात. यंदाच्या स्थितीत उशिराच्या पावसाने टोमॅटोचे पीक व्हायरस, बुरशी, सुकव्याने वाळून जाण्याच्या तक्रारी यापूर्वी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. यंदा गिरणारे, दुगाव, गोवर्धन, मुंगसरा, मातोरीसह पश्चिम आदिवासी भागात टोमॅटोची मोठया प्रमाणात लागवड झाली आहे. काळ कोरोना महामारीचा असला तरी शेतकऱ्यांनी भांडवल उभे करून टोमॅटोच्या विविध वाणांची लागवड केली आहे. महागडी बियाणे, खते, विकत घेतलेली रोपे, खते, कीटकनाशके, मजूर, मशागतीची मेहनत या सर्व खर्चाचे गणित उत्पादनानंतर भाव टिकल्यास सुटेल या आशेवर टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे. मात्र यंदा परतीच्या पावसाचा कहर सर्वत्र होता. त्यात टोमॅटो रोपांवर सुकवा येण्याचे प्रमाण वाढल्याने गालोशी पाड्यावरील शेतकऱ्याचे उभे पीक सुकव्यात नष्ट झाले आहे. मोठया आशेने मेहनतीने पिकविलेल्या टोमॅटो लागवडीवर वाढता व्हायरसचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा > पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान

यंदा टोमॅटो लागवड जास्त आहे. मेहनत व खर्चाने उभे केलेले पीक कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना उभारी देईल ही आशा आहे. गिरणारे टोमॅटो मार्केटमध्ये व्यापारी गाळे उभे झाले असून टोमॅटो हाताळणी सुरू झाली आहे. व्हायरस बुरशीजन्य रोगांना आटोक्यात आणण्यासाठी कीटकनाशक खर्च ही वाढला आहे. यात नुकसानग्रस्त टोमॅटो उत्पादकांना शासकीय मदत मिळाली पाहिजे अशी मागणी मी शेतकरी वाचवा अभियान वतीने करीत आहे. - एकनाथ बेंडकोळी

हेही वाचा > दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा