photos : लॉकडाउनमध्येही दाऊदी बोहरा समाजाची ईद उत्साहात...घरातच ईदचे नमाज पठण!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

परंपरेनुसार रमजान महिन्यातील ३० उपवास पूर्ण झाल्याने शनिवार (ता.23) रोजी दाऊदी बोहरा समाज बांधवांनी रमजान ईद घरीच मात्र पारंपरिक उत्साहात साजरी केली. समाजाचे 53 वे धर्मगुरू सय्यदना आली कद्र मुफद्दल भाईसाहेब यांनी रमजान पर्वासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत यंदाचा रमजान आणि ईद समाजबांधवांनी साजरी केली. 

नाशिक : (इंदिरानगर) परंपरेनुसार रमजान महिन्यातील ३० उपवास पूर्ण झाल्याने शनिवार (ता.23) रोजी दाऊदी बोहरा समाज बांधवांनी रमजान ईद घरीच मात्र पारंपरिक उत्साहात साजरी केली. समाजाचे 53 वे धर्मगुरू सय्यदना आली कद्र मुफद्दल भाईसाहेब यांनी रमजान पर्वासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत यंदाचा रमजान आणि ईद समाजबांधवांनी साजरी केली. 

मदतीचे आणि सहकार्याचे विशेष कौतुक

आज शनिवारी दुपारी 1 वाजता डॉ. सय्यदना यांनी खंडाळा येथून दिलेल्या विशेष प्रवचनाचा सर्वांनी ऑनलाईन लाभ घेतला. देशावर आणि जगावर असलेले कोरोना महामारीचे संकट लवकर दूर व्हावे यासाठी त्यांनी विशेष प्रार्थना केली. तसेच प्रत्येकाने ईदचे विशेष नमाज पठण करत असताना ही प्रार्थना करावी असे सूचित केले. या संपूर्ण काळात सर्व समाज बांधवांनी सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला केलेल्या मदतीचे आणि सहकार्याचे विशेष कौतुक करत हीच परंपरा पुढे ठेवावी असे त्यांनी सर्वांना सांगितले. त्यानंतर सर्वांनी शहराचे अमिल मुस्ताली भाईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली घरातच नमाज पठण केले. सर्व बांधवांनी एकमेकांना मोबाईलद्वारे आणि व्हिडीओ कॉलिंगद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या. देश या महामारीतुन मुक्त होण्याची प्रार्थना करण्यात आली. एरवी पारंपरिक शीरखुर्माचा आस्वाद घेण्यासाठी समाजबांधव मित्रपरिवार आणि आप्तेष्टांना आपल्या घरी बोलावतात. मात्र यंदा या सर्व बाबींना फाटा देण्यात आला. सर्व काही लवकर सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा ईदचे सेलिब्रेशन करू अशा भावना काहींनी व्यक्त केल्या. 

Image may contain: 1 person, close-up

Image may contain: 2 people, people standing and indoor

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

Image may contain: 1 person, indoor

पारंपारिक पांढऱ्या शुभ्र साया कुर्ता आणि टोपी या वेशात प्रार्थना करण्यात आल्या. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्यात आले. संपूर्ण महिनाभर कुणीही बाहेर पडले नाही. अथवा शेजारी देखील नमाज पठण आणि इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी हजेरी लावली नाही. सर्व बाबी ऑनलाइन करण्यात आल्या. परिस्थितीमुळे पारंपारिक आनंद घेता आला नसला तरी देश हिताच्या आणि शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेले आदेश पाळत सण उत्साहात साजरा केल्याचे आमिल मुस्ताली भाईसाहेब यांनी सांगितले.

हेही वाचा > सिनेस्टाईलने केला 'असा' प्रताप...नंतर रंगला पाठलागाचा थरार...अन् समोरच्या वाहनावर जेव्हा धडकले..तेव्हा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dawood Bohra Samaj celebrates Ramadan Eid by reciting Eid prayers at home due to corona nashik marathi news