तपोवन धार्मिक पर्यटनस्थळावर धक्कादायक प्रकार.. पोलीसांनी शोध घेताच झाला खुलासा

tapovan death.jpg
tapovan death.jpg

नाशिक : तपोवनातील रामसृष्टी उद्यानात धक्कादायक प्रकार काही नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी तत्काळ आडगाव पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.

काय घडले नेमके?

आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवनातील रामसृष्टी उद्यानात एका ४० वर्षीय युवकाच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आल्याचे सकाळी या भागात काही नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी तत्काळ आडगाव पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले असून मुळ हरसूल गावातील रहिवासी असलेला संतोष पवार असे मयत इसमाचे नाव असल्याचे समोर आले आहे. रामसृष्टी उद्यानात असलेल्या एका राहूटीजवळ संतोषचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले. रविवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा घडला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. याबाबत परिसरात माहिती घेतली जात असून अज्ञात हल्लेखोरांच्या शोधात गुन्हे शोध पथक रवाना झाले आहे. एका फिरस्ती करणाऱ्या इसमाच्या हत्त्या करण्यामागील कारण नेमके काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.

मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू

तपोवन या धार्मिक पर्यटनस्थळावर एका इसमाच्या डोक्यात दगड टाकून अज्ञात संशयितांकडून हत्त्या करण्यात आल्याचे सोमवारी (दि.३) सकाळी उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

संपादन - ज्योती देवरे

 ", 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com