आयटीआय प्रवेश अर्जाच्‍या दुरूस्‍तीसाठी रविवारपर्यंत मुदत

अरुण मलाणी
Friday, 25 September 2020

येत्‍या रविवार (ता.२७) सायंकाळी पाचपर्यंत इच्‍छुक विद्यार्थ्यांना आपल्‍या अर्जात दुरूस्‍ती करता येतील. यात प्रामुख्याने प्राधान्‍य बदलण्याचा पर्याय उपलब्‍ध असेल. काही अडचणी उद्भवल्‍यास सहाय्यता क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संचालनालयातर्फे केले आहे.  

नाशिक : औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (आयटीआय) च्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत अर्ज दाखल केलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्ज दुरूस्‍तीकरीता रविवार (ता.२७) पर्यंत मुदत असणार आहे. दुसऱ्या फेरीची प्रक्रिया स्‍थगित करण्यात आल्‍यानंतर सुधारीत वेळापत्रक लवकरच जारी केले जाणार असल्‍याचेही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

आयटीआय प्रवेशासाठी पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. या फेरीत प्रवेश निश्‍चित केलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्ज दुरूस्‍ती करता येणार नाही. पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेल्‍या सर्व विद्यार्थ्यांना अर्जात दुरूस्‍ती करण्याची संधी दिलेली आहे. याअंतर्गत गेल्‍या १७ सप्‍टेंबरपासून अर्ज दुरूस्‍तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर येत्‍या रविवार (ता.२७) सायंकाळी पाचपर्यंत इच्‍छुक विद्यार्थ्यांना आपल्‍या अर्जात दुरूस्‍ती करता येतील. यात प्रामुख्याने प्राधान्‍य बदलण्याचा पर्याय उपलब्‍ध असेल. काही अडचणी उद्भवल्‍यास सहाय्यता क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संचालनालयातर्फे केले आहे.  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline for correction of ITI admission application till Sunday nashik marathi news