मेन्स पार्लरमध्ये शिरून दाम्पत्याला मारहाण....धक्कादायक प्रकार

mens saloon.jpg
mens saloon.jpg

नाशिक / म्हसरूळ : दुपारी दीडच्या सुमारास मेन्स पार्लरचा मालक कुलदीप कापसे याने संजय याला "तू सागर याला माझ्याविरुद्ध भडकावून काम सोडण्यास सांगितले', असा आरोप केला. "तुम्हाला मारून टाकले पाहिजे' असे म्हणत चाकूने संजयवर वार केला. शेजारी उभी असलेली संजय यांची पत्नी अनिता यांनी मध्ये हात आडवा केला. अन् मग...

असा घडला प्रकार

कलानगर येथील बालाजी चौकात कोमल अपार्टमेंटमध्ये संजय राधेश्‍याम कानोजिया (वय 34) राहतात. याच अपार्टमेंटमध्ये गाळा क्रमांक दोनमध्ये त्यांचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. शेजारील गाळ्यात ऍक्‍टिव्ह मेन्स पार्लर आहे. या मेन्स पार्लरमध्ये संजय यांचा सागर नावाचा मित्र काम करत होता. काही कारणास्तव तो काम सोडून गेला. रविवारी (ता. 5) दुपारी दीडच्या सुमारास मेन्स पार्लरचा मालक कुलदीप कापसे याने संजय याला "तू सागर याला माझ्याविरुद्ध भडकावून काम सोडण्यास सांगितले', असा आरोप केला. "तुम्हाला मारून टाकले पाहिजे' असे म्हणत चाकूने संजयवर वार केला. शेजारी उभी असलेली संजय यांची पत्नी अनिता यांनी मध्ये हात आडवा केला. यामुळे वार हातावर झाल्याने त्या जखमी झाल्या. संशयिताने संजय यांच्या पोटावर वार केला. आरडाओरडा झाल्याने संजय यांचा भाऊ व आजूबाजूचे नागरिक जमा झाले. नागरिकांनी व संजय यांच्या भावाने संजय यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी संजय कनोजिया यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून संशयितास ताब्यात घेतले.  

संशयिताला अटक

दिंडोरी रोडवरील कलानगर येथील नाभिक व्यावसायिकाने शेजारील लॉन्ड्री दुकानचालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात लॉन्ड्रीचालक व त्यांची पत्नी दोघेही जखमी झाले. याप्रकरणी संशयित कुलदीप ऊर्फ गणेश कापसे यास पोलिसांनी अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com