भरदुपारी चौकात तरुणावर सहा जणांकडून जीवघेणा हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल

अंबादास शिंदे
Sunday, 4 October 2020

अण्णा हजारे रोडवर एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले. जखमीला महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

नाशिक : (नाशिकरोड) अण्णा हजारे रोडवर एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले. जखमीला महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अशी आहे घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन अली मेहबूब अली महमद अली (वय 54, एकलहरे रोड) हे शनिवारी (ता. 3) रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जात असतांना रोडवरील भोले ज्वेलर्स समोरून संशयित आरोपी गोविंद संजय साबळे, हुसेन शेख, अक्षय नाईकवाडे हे (एम एच 15 सी. एल. 9914)  दुचाकीवरून आले. त्यांच्यासोबत अजून तिघे दुचाकीवरून आले. त्यांनी 'टीप्या कोठे आहे? त्याचा पत्ता सांग, त्याला मोबाईल कर.' असे सांगून कोयत्याने हल्ला केला. यात हुसेन अली मेहबूब अली महमद अली यांच्या नाकावर, हातावर जखमा झाल्या. त्याच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा >  लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा

याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान उपनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या उपस्थित शांतता समिती व पोलीस मित्र यांची बैढक सुरु होती. अन् दुसरीकडे एकवार कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

हेही वाचा > तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A deadly attack on one with a sharp weapon nashik marathi news