जनावरे, पक्षांच्या मृत्यूबद्दल अनुदानाचा शुक्रवारी ॲक्शन प्लॅन! शेतकऱ्यांना भरपाई मिळणार

 manure_800.jpg
manure_800.jpg

नाशिक : (नाशिक रोड) जून ते ऑक्टोबरदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात शेतीची परिस्थिती बिकट होत आहे. यातच ज्या प्राण्यांवर व पशुपक्ष्यांवर शेती अवलंबून आहे, त्यांचाही या पावसामुळे मृत्यू ओढवला. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांत मिळून ४०५ शेतकरी कुटुंबातील ५२८ जनावरे दगावली असून, कुक्कुटपालनातील नऊ हजार ८७५ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. 

९० शेतकरी कुटुंबांना भरपाई मिळणार

सध्या पंचनामे सुरू असून, अनुदान देण्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) ॲक्शन प्लॅन जाहीर होणार असल्याचे सूतोवाच विभागीय महसूल आयुक्त कार्यालयातून करण्यात आले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना शेतकरी नेहमीच करत आला आहे. त्यातच मध्यम आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीला मदत करणाऱ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाने वर्गवारी करताना मोठे व लहान दुधाळ पशुधन, ओढ काम करणारे मोठे व लहान पशुधन अशी वर्गवारी केली आहे. शेतीला उपयुक्त असणाऱ्या बैल, गाय, घोडा, शेळ्या-मेंढ्या यांच्याप्रमाणेच कोंबड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. दगावलेल्या शेती उपयुक्त जनावरांच्या शेतकरी मालकांना शासन मदत करणार आहे. पाचही जिल्ह्यांमध्ये जनावरांचे नुकसान झालेली ४०५ शेतकरी कुटुंबे आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात २५२, धुळे- १६, नंदुरबार- ०, जळगाव- ४७, तर नगर जिल्ह्यात ९० शेतकरी कुटुंबांना भरपाई मिळणार आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात पंचनामे संथगतीने 

शासनाने सर्व्हे करण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील पंचनामे अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीचे, पशु-पक्ष्यांचे, घरांचे व पिकांचे नुकसान यांची आकडेवारी निरंक दिसून येत आहे. यावरून तेथील अधिकारी-कर्मचारी अतिशय धीम्या गतीने काम करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जिल्हानिहाय नुकसान 
जिल्हा जनावरे कुक्कुटपालन 

* नाशिक २८४ ५००५ 
* धुळे ५० ३०० 
* नंदुरबार ०० ०० 
* जळगाव ५४ ७० 
* नगर १४० ४५०० 
एकूण ५२८ ९८७५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com