क्रूर नियती..नवजात लेकराचा काय दोष? विवाहितेला मातृत्वाचे सुख तर लाभले...पण...

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

रेखा हिला सोमवारी हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी आणले होते. या महिलेस इतर त्रास असल्याची माहिती डॉक्‍टरांनी त्यांच्या नातेवाइकांना दिली होती. सोमवारी दुपारी सीझेरिंगने महिलेची प्रसूती होऊन मुलगी झाली. सोमवार दिवस भर तसेच रात्री सुखरूप रुग्णालयात उपचार घेत होती. परंतु मंगळवारी...

नाशिक / घोटी : सोमवारी दुपारी सीझेरिंगने महिलेची प्रसूती होऊन मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून खूश होते कुटुंबिय.. रेखा हिला सोमवारी श्रद्धा हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी आणले होते. या महिलेस इतर त्रास असल्याची माहिती डॉक्‍टरांनी त्यांच्या नातेवाइकांना दिली होती.. सोमवार दिवस भर तसेच रात्री सुखरूप रुग्णालयात उपचारही घेत होती. परंतु मंगळवारी...

मंगळवार ठरला काळा दिवस...आई हिरावली

मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील विवाहिता रेखा लक्ष्मण गांगड (वय 26) हिला सोमवारी श्रद्धा हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी आणले होते. या महिलेस इतर त्रास असल्याची माहिती डॉक्‍टरांनी त्यांच्या नातेवाइकांना दिली होती. सोमवारी दुपारी सीझेरिंगने महिलेची प्रसूती होऊन मुलगी झाली. सोमवार दिवस भर तसेच रात्री सुखरूप रुग्णालयात उपचार घेत होती. परंतु मंगळवारी सकाळी सदर महिलेस अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला असता डॉक्‍टरांनी तिला नासिक येथे घेऊन जाण्यास सांगितले असता, सदर महिलेचा नासिक येथे जाताना रस्त्यातच मृत्यू झाला.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

मृतदेह शव विच्छेदननंतर नातेवाईकांकडे सोपवला

शहरातील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी आलेल्या विवाहिता स्त्रीचा अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने नाशिक रेफर दरम्यान प्रवासात मृत्यू झाला.  रेखा गांगड हिस नाशिक ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन केले असून तिचा मृतदेह शव विच्छेदन नंतर तिच्या नातेवाईक यांच्या कडे देण्यात आला.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a married woman who gave birth nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: