PHOTO : मरणानंतरही सुटेना भोग!...खासदारांच्या मदतीने सुटला तिढा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

या प्रकरणी वीज कंपनीने भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी करत अंत्यविधी रोखून धरला. खासदार गोडसे व वीज कंपनीचे अधिकारी संदीप चव्हाण ग्रामस्थांची समजूत काढत मृताच्या वारसांना नियमाप्रमाणे सरकारी मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिल्याने अंत्यविधी पार पडला. 

नाशिक : (देवळाली कॅम्प) संसरी गावातील भगूर रोडवर असणाऱ्या आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या संजय रामदास गोडसे (वय 47) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांना कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

अशी घडली घटना

शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास संजय गोडसे शेतात पाणी देत असताना विजेचा प्रवाह पाण्यात उतरला व त्याचा धक्का लागून ते कोसळले. घरच्यांनी तातडीने काठीच्या सहाय्याने वीजप्रवाह बंद केला. संजय यांना कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. ही बाब गावात समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनावर संताप व्यक्‍त करताना अंत्यविधी रोखण्यात आला होता. खासदार हेमंत गोडसे व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर सायंकाळी अंत्यविधी झाला. सरपंच विनोद गोडसे, विजय गोडसे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयात बोलावून घटनेची माहिती दिली. 

हेही वाचा > शिवभोजनचा 'येथे' वेगळाच पॅटर्न!...लिमिटेड शिवथाळी अनलिमिटेड...

Image may contain: 1 person

ग्रामस्थांनी अंत्यविधी रोखून धरला

ग्रामस्थांनी आधीच याबाबत वीज वितरण कंपनीला निवेदन देऊनदेखील वीजतारांची योग्य तजवीज न केल्याने ही घटना घडल्याचे सांगितले. त्यानंतर उत्तरीय तपासणी साठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असता त्यांनी विजेचा धक्का लागून मृत झाल्याचा दाखला दिला. या प्रकरणी वीज कंपनीने भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी करत अंत्यविधी रोखून धरला. खासदार गोडसे व वीज कंपनीचे अधिकारी संदीप चव्हाण ग्रामस्थांची समजूत काढत मृताच्या वारसांना नियमाप्रमाणे सरकारी मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिल्याने अंत्यविधी पार पडला. 

हेही वाचा > आर्श्चयच!..स्वतःला लागणारी वीज अन् ते देखील घरच्या घरीच तयार!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of one due to With the shock of electricity nashik marathi news